Breaking

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे टेंभुर्णी शहर अध्यक्षपदी प्रतीक माने यांची निवड



मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे टेंभुर्णी शहर अध्यक्षपदी प्रतीक माने यांची निवड   

  

    टेंभुर्णी प्रतिनिधी :- 
मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले व युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ममित चौगुले यांच्या आदेशाने टेंभुर्णी शहर युवक अध्यक्षपदी प्रतीक माने  यांची निवड करण्यात आली. त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष धोत्रे सर यांच्या हस्ते देण्यात आले. 
टेंभुर्णी शहरांमध्ये मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे तसेच समाजातील तळागाळापर्यंत विजयदादा चौगुले साहेबांचा विचार पोहोचवुन त्यांच्या विचारांची टेंभुर्णी शहरात  युवकांची मोठी फळी निर्माण करणार असल्याचे मत नूतन  अध्यक्ष प्रतीक माने यांनी यावेळी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा