Breaking

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

अक्षरा लॉंन्ड्रीचे मालक राहूल बाळू लोंढेचा प्रामाणिकपणा*



*अक्षरा लॉंन्ड्रीचे मालक राहूल बाळू लोंढेचा प्रामाणिकपणा*््



*ग्राहकाचे चकून कपड्यात आलेले पैसे केले परत*
टेंभुर्णी प्रतिनिधी:-  ९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ : ३० वाजता नेहमी प्रमाणे कपडे धुण्यास व इस्त्रीसाठी टेंभुर्णी येथील प्रा . साहेबराव शिंदे आले . तसेच दुपारी १:०० वाजता त्यांच्या लक्षात आले की आपल्या खिशात पैसे नाहीत तर ते इस्त्रीसाठी टाकलेल्या कपड्यात आहेत तेव्हा त्यांनी दुकानदार राहुल लोंढे यांना फोन करुन पॅंटीच्या खिशात पैसे आलेत का ? खात्री करण्यास सांगितले व चालू फोनमध्येच पैसे असल्याचे सांगून घेऊन जाण्यास सांगीतले .
दुपारी २ : ३० वाजता त्याने ४५००रु . त्यांना दिले व तेवढेच होते का याची खात्री करणास सांगितले व जेवढी रक्कम होती तेवढी बरोबर असल्याचे समजताच प्रा . शिंदे यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व त्यांस बक्षीस देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही .
या अगोदर ही मोठमोठ्या रक्कमा परत केल्याचेही राहूल लोंढे यांनी सांगितले .
आजकाल पैशांसाठी खोटे बोलणाऱ्या जमान्यात प्रामाणिकता जपणारा प्रेमळ, संयमी, साधा गरीब असणारा माणूस टेंभुर्णी -करमाळा रोडलगत सनराईज् स्कूलच्या शेजारी छोटेसे दुकान असणारा राहुल लोंढे यांनी अनेकांची मने जोडणारा माणूस म्हणून टेंभुर्णी परिसरात त्यांचा नावलौकीक आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा