Breaking

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

राजलक्ष्मी प्रमोद भैस हिचा शालेय साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा



राजलक्ष्मी प्रमोद भैस हिचा शालेय साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा


पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस

वाढदिवस साजरा करण्याचा सध्या ट्रेंड निर्माण झाला आहे.पूर्वी लहान मुलांचे वाढदिवस साजरे केले जात होते परंतु आता लहानांपासून थोरांपर्यंत हार,फेटा,बांधून केक कापत मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला जातो.
परंतु पिलीव ता माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडेवस्ती येथे इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या राजलक्ष्मी प्रमोद भैस हिच्या सातव्या वाढदिवसानिमित्त 
तिचे पालक प्रमोद भैस यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा  नाहक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चवरे सर , शिक्षिका देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून  कु राजलक्ष्मी भैस हीचा सत्कार करून तिचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक  चवरे सर म्हणाले की आपण सर्व पालकांनी असाच आदर्श घेऊन आपल्या पाल्याच्या वाढदिवसाचा नाहक खर्च टाळून आपल्या भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना असेच शालेय उपयोगी भेट देऊन असाच अनोखा उपक्रम साजरा करावा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा