बेंंबळे ग्रामपंचायती तर्फे "टेंभुर्णी-शहर ग्रामीण" पत्रकारांचा हृद्य सत्कार ...
बेबळे। प्रतिनिधी।
सहा जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी- शहर ग्रामीण पत्रकार संघटनेतील पत्रकारांचा बेंबळे ग्रामपंचायतच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम संघटनेचे सचिव गणेश पोळ यांनी टेंभुर्णी- शहर ग्रामीण पत्रकार संघटनेची भूमिका विशद केली. मुकुंद रामदासी यांनी उपस्थित मान्यवरांची सर्वांना ओळख करून दिली. त्यानंतर सरपंच विजय पवार ज्येष्ठ नेते रत्नाकर कुलकर्णी कैलास भोसले उपसरपंच नमिताताई अनपट सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा रेशीम शाल श्रीफळ पुष्पहार गुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार रघुनाथ वाघमारे व हरिश्चंद्र गाडेकर यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व व बातमीदारांना येणाऱ्या समस्या यांचा ओवापोह करून ग्रामीण भागात वार्ताहर असल्यामुळे शासकीय व प्रशासकीय पातळीवर अनेक समस्या सुटण्यास मदत होत असूनp वाचकांची संख्या देखील वाढू लागली आहे असे सांगितले. आपल्या आशीर्वादपर भाषणात 76 वर्षीय जेष्ठ भाजपानेते रत्नाकर बेंबळेकर म्हणाले की माझे वडील कै. विष्णुपंत बेंबळेकर हे 30 ते 35 वर्षे ग्रामीण पत्रकार म्हणून काम पाहत होते ,त्यांचा वारसा मुकुंद रामदासी सिद्धेश्वर शिंदे व इतर ३ वार्ताहरांनी पुढे चालू ठेवला असल्यामुळेच बेंबळे गावचे नाव जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात माहीत झालेले आहे, तुम्हा सर्वांना तुमच्या कारकीर्दीस माझे मनःपूर्वक आशीर्वाद. या कार्यक्रमास पत्रकार मुकुंद रामदासी रघुनाथ वाघमारे सज्जन शिंदे गणेश पोळ हरिश्चंद्र गाडेकर धनंजय भोसले सचिन जगताप अभयसिंह भोसले समाधान निर्धार, सुरवसे, श्रीखंडे यांचे सह गावातील सर्व थरातील प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा