उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ ......धीरज साळे
*************************** AJ 24Taas News साठी मुकुंद रामदासी। बेंबळे प्रतिनिधी
****************************उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यास आले असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
वृत्तांत असा की मागील 2022 च्या पावसाळ्यात सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली होती व त्यामुळे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या 17 बंधाऱ्यात मुबलक पाणी साठा झालेला आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी व चिंचपूर बंधार्यात देखील पुरेसा पाणीसाठा होऊन पुढे कर्नाटक हद्दीत पाणी वाहून जात होते. परंतु सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी बंधाऱ्यातील पाणी पातळी 13 ते 14 जानेवारी दरम्यान संपलेली होती व नंतर चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्यावर सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे ,परंतु यातील पाणी पातळी एक ते दोन फेब्रुवारी 23 पर्यंत टिकणार असल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तांनी जलसंपदा विभागाकडे पाणी मागणीचे पत्र पाठवले होते व त्यानुसार 23 जानेवारी 23 रोजी सायंकाळी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 1600 क्यूसेक्स( हे पाणी पुन्हा नदी प्रवाहात सामील होते) तर 8 दरवाजा मधून (गेटस् )4400 क्यूसेक्स असे एकूण 6000क्यूसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे. उजनी धरण ते टाकळी बंधारा हे भीमा नदीतील प्रवाही अंतर 232 किलोमीटर असून आठ ते नऊ दिवसात म्हणजेच 1 फेब्रुवारी 23 च्या दरम्यान नदी प्रवाहातील पाणी टाकळी व नंतर चिचपूर बंधाऱ्यात पोहोचेल व सोलापूर शहरासाठी पुढील दोन ते अडीच महिने पाण्याची चिंता भासणार नाही. या आठ ते नऊ दिवसांमध्ये धरणातून एकुण पाच ते साडेपाच टिएमसी पाणी नदीपात्रात सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडण्यात येत आहे . दरम्यान भीमा नदी काठावरील पाणीपुरवठा होणाऱ्या पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरा सहित नदीकाठावरील लहान मोठी गावे, वाड्या -वास्त्या व पाणीपुरवठ्याच्या अनेक संस्थांना पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे नदी प्रवाहातील पाणी नियोजित वेळेत टाकळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचावे म्हणून नदी काठावरून शेतीसाठी उचल पाणी घेणाऱ्या विद्युत पंपांचे सर्व ट्रान्सफॉर्मर्स कनेक्शन्स कट करून टाकण्यात आलेले आहेत.
***************
* 23-1-2023 ,सोमवार उजनी धरणाची स्थिती*
*पाणीपातळी........ 496. 730 मीटर
*एकूण पाणीसाठा.. 3286.54 दशलक्ष घनमीटर
..... 116.05 टीएमसी
*उपयुक्त पाणीसाठा..1483.73 दशलक्ष घनमीटर
.......52.39 टिएमसी
*टक्केवारी........... 97.79 टक्के
... *धरणातून विसर्ग .....
*दहिगाव सिंचन योजना.... 40 क्यूसेक्स
*सीना माढा सिंचन योजना.... 00
*भीमा -सीना जोड कालवा (बोगदा)..00
*मुख्य कालवा.... 2000 क्यूसेक्स
*वीज निर्मिती केंद्र.... 1600 क्यूसेक्स
..धरणाच्या 8 दरवाज्यातून... 4400 क्यूसेक्स .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा