Breaking

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

माळशिरस तालुका सिडस पेस्टीसाइड व फरटीलायझरस डिलर असोशिएशनच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन, अन्यथा ३० तारखेपासून बेमुदत संपाचा इशारा



माळशिरस तालुका  सिडस पेस्टीसाइड व फरटीलायझरस डिलर असोशिएशनच्या वतीने  विविध  मागण्यांचे निवेदन, अन्यथा ३० तारखेपासून  बेमुदत संपाचा इशारा


पिलीव प्रतिनिधी-प्रमोद भैस

माळशिरस तालुका  सिडस पेस्टीसाइड व फरटीलायझरस  अशोसिएशनच्यावतीने आपल्या  विविध  मागण्यांचे निवेदन  आ रणजितसिंह मोहीते पाटील, आ राम सातपुते, तालुका  कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास आधिकारी, तहसीलदार  माळशिरस, पोलीस निरीक्षक  माळशिरस  यांना विविध  मागण्यांचे निवेदन  दिले आहे  यामध्ये  रासायनिक खतांसोबत उत्पादकांकडुन होत असलेल्या  अवाजवी लिंकींगबाबत ,रासायनिक  खत उतपादकाकडुन दुकानदारांना होणारे एक्स  खत पुरवठयामुळे,होणारा अन्याय  व त्या अनुषंगाने  शासनाच्या  नियमांचे होणारे उल्लंघन, रासायनिक  खत ,बि बियाणे,व किटकनाशके याचे नमूने अप्रमाणीत आल्यावर  होणाऱ्या  कारवाईबाबत,रेल्वे  स्टेशन व गोदामामधुन व्यापाऱ्यांना  पोहोच मिळणेबाबत, कंपनी कडुन सिल प््क आलेला माल त्याचे समपलींग  गुणनियंत्रण  अधिकाऱ्यांकडुन नमुने काढले जात असता त्याचा नमुना  फेल गेला की काही  संबंध  नसताना  दुकानदारावर कारवाई केली  जाते.तरी अशावेळी  उतपादकांवर कारवाई  करावी.
खरीप २०२२ च्या  सुरुवातीलाच महाराष्ट्राचे कृषीमंत्री  व केंद्राने लिंकींग न करणायाचे आदेश दिले आहेत परंतु खत उतपादकांनी स्वतःच्या  फायदयासाठी लिंकींग चालुच ठेवले आहे. केंद्र सरकार  रासानिक खतावर मोठे अनुदान  देते.रेल्वे  स्टेशनवर खताचा रक असताना ते गोदामात  नेऊन  नंतर  व्यापाऱ्यांना  बोलावले जाते यामुळे  खरे तर  वाहतुकीचा खर्च  वाढतो याचा शेतकऱ्यांना  मोठा भुरदंड  बसतो .या सर्व  बाबी बाबत खत उतपादकाकडुन  लेखी आश्वासन  शासनाला व विक्रेत्यांना  दिले नाही  तर ३० जानेवारी पासून  सर्व  विक्रेते बेमुदत संपावर जाण्याचा इशारा माळशिरस तालुका सिडस पेस्टीसाइड व फरटीलायझरस अशोसिएशनच्यावतीने  देण्यात  आला आहे. तसेच  संपामुळे  शेतकऱ्यांनच्या  होणाऱ्या  नुकसानीस आम्ही  जबाबदार  नसल्याचे अशोसिएशनच्यावतीने  निवेदनात  म्हंटले  आहे. या निवेदनावर अध्यक्ष  भिमराव  शेंडगे,उपाध्यक्ष  सुनील  गांधी ,सचिव  उमेश देशमुख, सहसचिव  महावीर शेंडगे ,खजिनदार  संतोष  साळी यांच्या  सहया आहेत 

 फोटो  - माळशिरस तालुका  सिडस पेस्टीसाइड व फरटीलायझरस अशोसिएशनच्यावतीने  तालुका कृषी अधिकारी  चव्हाण  यांना  निवेदन  देताना (२)आ रणजितसिंह मोहीते पाटील व आ राम सातपुते यांना  निवेदन  देताना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा