रोटरी क्लब टेंभुर्णी चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार डी एस गायकवाड यांना तर उदयनमूख पत्रकारिता पुरस्कार सतीश काळे यांना प्रधान.
टेंभुर्णी : (प्रतिनिधी) रोटरी क्लब टेंभुर्णी यांच्या वतीने समाजातील वेगवेगळ्या लोकांना सन्मानित करण्यात येते याही वर्षी रोटरी क्लब टेंभुर्णी यांच्या माध्यमातून टेंभुर्णी मध्ये भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी समाजातील मान्यवर लोकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डी एस गायकवाड यांचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
तर उदयन्मुख आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन टेंभुर्णी प्रेस क्लबचे मा.उपअध्यक्ष सतीश काळे यांना सन्मानित करण्यात आले.
करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचित्र व सन्मानपत्र देऊन वरील पत्रकार द्वयांचा सन्मान करण्यात आला टेंभुर्णीतील दैनिक लोकमतचे पत्रकार दिवस गायकवाड हे गेली २५ - ३०वर्ष टेंभुर्णी मधून पत्रकारितेचे काम करत असून या भागातील अनेक प्रश्नांना त्यांनी आपल्या दैनिकातून वाचा फोडली आहे त्याचबरोबर माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाट आहे त्यांच्या या कार्याचा गौरव टेंभुर्णी रोटरी क्लब च्या वतीने आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन करण्यात आला तसेच नव्यानेच पत्रकारितेत पाऊल ठेवलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख असलेले व दैनिक जन्मत चे सतीश काळे यांना आपल्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल उदयन्मुख आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा