अकोले ( खु . ) येथील बबनरावजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांना रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णी यांच्याकडून २०२१ - २२ चा रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार अकोले खुर्द येथील मा.बबनरावजी शिंदे माध्यमिक व कला , वाणिज्य , विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर यांना नुकताच पुरस्कार करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राजेंद्र ठोंबरे सर यांनी संस्थेचे अध्यक्ष आ.संजयमामा शिंदे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली अकोले खुर्द येथे भव्य अशा महाविद्यालयाची उभारणी करून तळागाळातील गोरगरीबांची मुले उच्च शिक्षणापर्यंत कशी पोहोचतील याची जबाबदारीने काळजी घेत विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत येण्यासाठी अनेक बसेसची सोय करून उच्च दर्जाचे शिक्षण विद्यालयातून दिले. तसेच विद्यालयाच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवित एक आदर्श शाळा निर्माण केली.या शिक्षण सेवेची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णी यांच्या वतीने रोटरी सेवा व्यवसाय पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे,करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे, जिल्हा दूध संस्थेचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे, माढा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे, निमगाव टें चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, कै.विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाडचे प्राचार्य जवानसिंग रजपूत, विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला कन्हेरगाव चे मुख्याध्यापक अमोल लोंढे,स.रा.मोरे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे, यशवंत प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अर्चना नेवसे, जेष्ठ शिक्षक संभाजी अनपट तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा