*तुळजापूर शहरातील ' जे.बी. कॉम्प्युटर्स मध्ये मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींना 'सीएसएमएस- डीईईपी' हा अभ्यासक्रम मोफत*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर शहरातील जे.बी.कॉम्प्युटर्स मध्ये मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींना 'सीएसएमएस-डीईईपी' हा
अभ्यासक्रम मोफत शिकविला जाणार आहे.विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी 'सारथी' व 'एमकेसीएल' यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून,ऑनलाईन नोंदणी शेवट तारीख 31 जानेवारी आह, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा,असे अवाहन एमकेसीएल चे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर व जे.बी. कॉम्प्युटर्स चे संचालक संजय जाधव सर यांनी केले आहे.CSMS DEEP Digital Employability Enhancement Program या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अभ्यासक्रम मोफत आहे. घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहिजे,तसेच संबंधित विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे,पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे,तसेच प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी दाखला आवश्यक आहे.छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल)यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.मराठा, कुणबी,कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी हा सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून,१० हजार युवक- युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण एमकेसीएलच्या अधिकृत केंद्रामार्फत दिले जाईल. ऑनलाइन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा