Breaking

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख, तर व्हा चेअरमनपदी शोभा रोकडे यांची बिनविरोध निवड



चैतन्य ग्रामीण  बिगर शेती  सहकारी  पतसंस्थेच्या  चेअरमनपदी  रामचंद्र  उर्फ  नानासाहेब  देशमुख, तर व्हा चेअरमनपदी  शोभा रोकडे यांची बिनविरोध निवड   

                  पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-  माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  चैतन्य  ग्रामीण बिगर शेती सहकारी  पतसंस्थेच्या  संचालक  मंडळाची  निवडणूक  बिनविरोध झाली  होती.आज चेअरमन  व व्हा चेअरमन  निवडीसाठी सर्व  संचालक  मंडळाची पतसंस्थेच्या  कार्यालयात  सहहयाक  उपनिबंधक  तथा निवडणूक  निर्णय  अधिकारी  राऊत यांच्या  अध्यक्षतेखाली  बैठक  बोलाविण्यात आली होती. यावेळी  चेअरमन  पदासाठी  रामचंद्र  उर्फ  नानासाहेब  देशमुख  यांचा एकमेव  अर्ज  तर व्हा  चेअरमन पदासाठी  सौ शोभा संजय  रोकडे यांचाही एकमेव  अर्ज  आला .यामुळे  या दोघांच्याही  बिनविरोध निवडी झाल्या. यावेळी  नुतन  संचालक  आरिफखान पठाण, प्रभाकर  वाघमारे, विठ्ठल  भिसन,ऐश्वर्या  देशमुख, प्रदीप चोबे,क्षितीजा गुळभिले, तुकाराम  पडळकर, विशाल  पिसे,जगन्नाथ  करडे उपस्थित  होते.निवडीवेळी माजी चेअरमन  मिलींद  गुळभिले, प्रकाश  घाटे,माजी सरपंच  अमोल  मदने,नामदेव  देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  कुमार भैस,कल्याण  जावळे,दत्तात्रय  भैस,मिनाक्षीदेवी  देशमुख, सचिन  भैस, अशोक बगाडे,राजेंद्र  लोखंडे, कुबेर भैस,अमीनखान  पठाण,संतोष  पडळकर, माजी उपसरपंच  मोहन करांडे,संजय  रोकडे,महादेव  तावरे,महादेव  वाघमारे  , मौला मुलाणी,सुरज कस्तुरे यांच्या सह अनेक  मान्यवर  या निवडीवेळी उपस्थित होते.  पतसंस्थेचे रघुनाथ  नरळे व सर्व  कर्मचारी  यावेळी  उपस्थित  होते.यावेळी  नुतन चेअरमन  ,व्हा  चेअरमन  व संचालकांचा मान्यवरांच्या  हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी  माजी चेअरमन  डॉ  मिलींद  गुळभिले, माजी सरपंच  अमोल  मदने, नामदेव देशमुख  यांनी मनोगत व्यक्त करुन  नुतन  संचालक  मंडळाने चांगले  काम करुन  संस्थेचा नावलौकिक  वाढवावा असे आवाहन  केले.तर नुतन चेअरमन  रामचंद्र  देशमुख यांनी बिनविरोध  निवड  केल्या बद्दल  आभार  मानले.        फोटो  - चैतन्य  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र  देशमुख व व्हा  चेअरमनपदी  शोभा रोकडे  यांची निवड  समवेत  नुतन संचालक  आरिफखान पठाण, तुकाराम  पडळकर, प्रभाकर  वाघमारे, ,विशाल  पिसे,व इतर संचालक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा