Breaking

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

माढा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन-शिबिराचे नियोजनासाठी होणार बैठक –आ.बबनराव शिंदे



माढा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन-
शिबिराचे नियोजनासाठी होणार बैठक –आ.बबनराव शिंदे


 

विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ,निमगांव टे व माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ऑप बँक लि.माढा यांचे सहयोगातून खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.08 ते 12 फेब्रुवारी,2023 या कालावधीमध्ये सन्मती नर्सिंग होम,माढा येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

 

विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ,निमगांव टे व माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ऑप बँक लि.माढा यांचे सहयोगातून प्रतिवर्षी खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दि.08 ते 12 फेब्रुवारी,2023 या कालावधीमध्ये जागतिक किर्तीचे नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिनी पारेख, सर जे.जे. रूग्णालय,मुंबई यांचे अधिपत्याखाली माढा येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दि.08 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशाला,माढा येथे नेत्ररूग्णांची तपासणी होणार आहे. त्यानंतर 09 ते 11 फेब्रुवारी दरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 12 रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची तपासणी व कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

 

या शिबिराचे नियोजनासाठी माढेश्वरी बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, शासकीय आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मंगळवार 17 जानेवारी रोजी संपन्न होणार असून बैठकीमध्ये शिबिराचे कामकाजाचे रूपरेषा ठरविण्यात येणार आहे अशी माहीती आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.

 

चौकट-

सामाजिक बांधिलकीच्या  भावनेतून सन 2006 पासून या शिबिराचे आयोजन माढा येथे करण्यात येत असून आजअखेर 22 हजार नेत्ररूग्णांची तपासणी करून 12 हजार नेत्र रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शिबिरामध्ये रूग्णांची राहणेची व जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून रूग्णांना चष्मे व औषधे मोफत पुरविण्यात येत आहेत. या शिबिराचे माध्यमातून अनेक गरजू वयोवृध्द रूग्णांना दृष्टी प्राप्त झालेली आहे-आ.बबनराव शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा