टेंभुर्णी येथील श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल चा ६ वा वार्षिक क्रीडादिन उत्साहात साजरा
टेंभुर्णी प्रतिनिधी/श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल चा ६ वा वार्षिक क्रीडादिन आज उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री उमेश व्यवहारे (पुशप्स मध्ये जागतिक विक्रमधारक),कु.वैष्णवी लोंढे (स्पीड बॉल, ऑलिम्पिक स्पर्धेत निवड)
श्री विजय लोंढे (केंद्रप्रमुख टेंभुर्णी)
श्री राजेंद्र चव्हाण (राष्ट्रीय तलवारबाजी पदक विजेते)
श्री सागर वाघ(राष्ट्रीय कुस्तीपटू व N.I.S कोच) या सर्वांचा संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख (काका), उपाध्यक्षा सौ लता बाळासाहेब देशमुख, (काकी),सचिव श्री हर्षवर्धन बाळासाहेब देशमुख , कार्यकारी संचालिका सौ प्रियांका हर्षवर्धन देशमुख आणि शाळेच्या प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांची उपस्थिती लाभली.
संस्थेचे सचिव श्री हर्षवर्धन बाळासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभारपर मनोगत व्यक्त करताना
परिपूर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडवण्यावर श्री शारदेय स्कूल चा नेहमीच भर राहील तसेच भविष्यातही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी असेच वेगवेगळे उपक्रम राबविले जातील असे सांगितले.
तसेच,यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, आमंत्रित मान्यवर,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावलेल्या सर्व पालक आणि क्रीडाप्रेमींचे आभार यावेळी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा