Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद, रुग्णवाहिका लोकार्पण - सदानंदराव भोसले



मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद, रुग्णवाहिका लोकार्पण - सदानंदराव भोसले



उलवे नवी मुंबई ( प्रतिनिधी) उलवे शहर येथे आयोजित मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण महोत्सवाला प्रचंड मोठा प्रतिसाद जनतेतून लाभला आहे निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र महापदी यांच्या हस्ते दिनांक २७ /१२/२२ रोजी सुरू झालेल्या या स्तुत्य उपक्रम करीता हजारो उलवेकर यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करत आहेत हा महोत्सव दिनांक २२ जानेवारी पर्यंत चालणार असून कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सिडको मैदानावर भव्य स्वरूपात केले असुन उरण पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागातून देखील लोकांनी उत्सुर्त प्रतिसाद देत आहेत उद्घाटन सोहळा प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड यांच्या सह अनेक सहकारी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
या वेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक सदस्य व गुजरात राज्य अध्यक्ष प्रदीप मोरे यांनी सांगितले काही डबक्यात ज्यांचे विश्व मानणारे लोक म्हणजे डबक्यातील बेडक् यांनी स्वप्नात मश्गूल राहावे पन लायकी नसताना दुसऱ्यावर चिखल फेक करु नका राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते सदानंदराव भोसले यांच्या ४० वर्षाच्या सामाजिक कार्याची जोड देऊन समाज संघटना ऊभी राहीली आहे येऱ्या गबाऱ्या गावडलांची काम नाही देशभर पसरलेल्या हजारो समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते याना एका छताखाली आणून समाज उत्कर्ष व्हावा ही संस्थापक अध्यक्ष यांची मनोभावे इच्छा आहे त्या साठी सकारात्मक चर्चा विचारांची माणसे देशभरातून जोडून त्यांच्या वर जबाबदाऱ्या देवुन स्वतः अहोरात्र मेहनत घेत आहेत हिंद मराठा महासंघ हे त्यांच्या विचाराचे अपत्य मात्र नाव काही मंदबुद्धी विचारांच्या लोकांनी चोरले आहे तर भोसले साहेब यांनी आपल्या कल्पक बुद्धीतून तयार केलेला लोगो देखील चेन्नई येथे नोंदणी करीता पाठवला असल्याने कळते असो मोठया मनाचे व विचारांच्या आमच्या नेत्यांनी या बाबत दुर्लक्ष करा असे सक्त आदेश देत आपल्या संघटनेकडे बघा नोंदणी प्रक्रिया अडथळे येताच नावात बदल करून मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकार मान्यता प्राप्त करून मराठा समाज हित जोपासणारी एकमेव राष्ट्रीय संघटना स्थापन केली दिग्गज मराठ्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावे घेऊन सामाजिक कार्याची जोड देत लाखो विद्यार्थ्यांना वह्या वाटप रुग्णवाहिका लोकार्पण गणवेश वाटप अनेक देशभर शहरात मराठा क्रांती स्वराज्य संघटना कार्यालये रक्तदान, आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली प्रचंड प्रतिसाद समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी यांच्यातील उत्साह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय भरारी थक्क व्हायला लावणारी आहे लवकरच सुरत शहर येथे गुजरात राज्य कार्यालयाचे उद्घाटन तसेच शिर्डी येथे अहमदनगर करिता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व नियुक्ती समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा