Breaking

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

आमदार बबनदादा शिंदे यांची माढेश्वरी बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

आमदार बबनदादा शिंदे यांची माढेश्वरी बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड 

माढा / प्रतिनिधी - माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदासाठी आमदार बबनराव शिंदे व व्हा.चेअरमन पदासाठी अशोक लुणावत यांचेच प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली साळवे यांनी दोघांच्याही निवडी बिनविरोध झाल्याचे शुक्रवारी घोषित केले.
यावेळी नूतन चेअरमन आ. बबनराव शिंदे यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली साळवे यांच्या हस्ते  करण्यात आला.

यावेळी चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की,बँकेचे संचालक मंडळ,सभासद,ठेवीदार, कर्जदार,हितचिंतक,अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे बँकेची नेत्रदिपक प्रगती झाली आहे.विशेष बाब म्हणजे बँकेचा एनपीए 'शून्य' टक्के असून सातत्याने ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे.बँकेचा कारभार पारदर्शक व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून सुरू असल्याने दरवर्षी नफा व ठेवीमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बँकेचे संचालक तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे,गोरख देशमुख,गणेश काशीद,राजेंद्र पाटील, अमित पाटील,विपुला लुणावत, डॉ.निशिगंधा कोल्हे,संजय खरात, दिगंबर माळी,अरविंद नाईकवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे,सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम,वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी,शाखाधिकारी अमोल मारकड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी - माढेश्वरी बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आ.बबनराव शिंदे यांचा सत्कार करताना निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली साळवे बाजूला  इतर मान्यवर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा