*टेंभुर्णी मध्ये भव्य राज्यस्तरीय खुल्या जनरल नॉलेज स्पर्धेचे आयोजन*
माऊली शिक्षण संस्थेच्या वतीने शिवमती सुरजा योगेश बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी आनंद विद्या मंदिर, करमाळा रोड, टेंभुर्णी येथे खुल्या जनरल नॉलेज स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. अशीच जनरल नॉलेज स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालत असते. या स्पर्धेमध्ये दोन गट असतील पहिल्या गटामध्ये तिसरी, चौथी, पाचवी व दुसऱ्या गटामध्ये सहावी, सातवी, आठवी व नववीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
दोन्ही गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे बक्षीसाचे स्वरुप राहील.
प्रथम बक्षीस 3033 रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय बक्षीस 2033 रुपये व सन्मान चिन्ह,तृतीय बक्षीस 1033 रुपये व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ 533 रुपये व सन्मानचिन्ह तसेच इतर 10 उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. परीक्षा विना शुल्क असणार आहे.
सर्व सहभागी परीक्षार्थींना विशेष आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.युवराज वजाळे सर 9689365014 , प्रा.सागर खुळे सर 8626058377 यांच्याशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा