*अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर, कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर येथे मोर्डा रोडवरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याचा पंचनामा करून तात्काळ गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने व शाळकरी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको अंदोलन केले होते सदर प्रशासनाकडून तीन महिन्याच्या आत कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले होते .आश्वासन देऊन पण प्रशासन योग्य ती गंभीर दखल घेत नव्हते व उडवा उडवी चे उत्तर दिली जात होती या सर्व वैतागून
कारवाही न केल्यामुळे आज दिनांक 01 फेब्रुवारी रोजी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर यांच्या कार्यालय समोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या तीन पदाधिकाऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला .परंतु वेळेतच पोलिसांनी आंदोलन करतेस ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टाळला . यावेळी उपस्थित आबासाहेब कापसे गणेश पाटील बालाजी जाधव निखिल आप्पा अमृतराव ,अरुणा आलोरे रवी पवार पंचाक्षरी चव्हाण गणीभाई मुलानी नेताजी शिंदे श्रीपाद मसलेकर बाळासाहेब पाटील पोपट भोवाळ साहेब जळकुटे साहेब पात्रे साहेब सुनील वाकसे संजय खामकर सुरज सरवडे विजय कोळपे मोतीराम चिमणे स्वाती जाधव इत्यादी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा