प्रा.डॉ.सचिन अनभुले यांना पी.एच.डी प्राप्त...
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुल येथील फार्मसी विभागाचे प्रा.डॉ.सचिन जालिंदर अनभुले यांनी वेल्स विद्यापीठ चेन्नई येथून फार्मसी मध्ये पी.एच.डी प्राप्त केलेली आहे.त्याबद्दल सर्वच थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.प्रा.डॉ.सचिन अनभुले हे श्रीगोंदा शहरातील नामाकिंत वकील व नोटरी ऑफिसर जालिंदर अनभुले यांचे चिरंजीव आहेत.प्रा.डॉ.सचिन अनभुले यांनी पी.एच.डी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे माजी मंत्री व श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते साहेब तसेच परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अकॅडेमिक डायरेक्टर इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते,प्राचार्य डॉ.सुनिल निर्मळ सर, प्रशासकीय अधिकारी अनिल पुंड, कॅम्पस डायरेक्टर डॉ.व्ही.एन.पाटील डॉ.सुनील निर्मळ,प्राचार्य कुलकर्णी सर ,डॉ.सुदर्शन गिरमकर सर,प्राचार्य रमेश शिंदे सर,प्राचार्य पांडुरंग इथापे सर, मेमन सर, इत्यादीनी त्यांचे अभिनंदन करून त्याचा परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अकॅडेमीक डायरेक्टर इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच श्रीगोंदा शहरातील जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, प्रा.बळे सर, महाराजा कॉलेज चे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के सर, इत्यादीनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा