माढा विधानसभा मतदारसंघ....
ग्रामीण भागातील कोट्यावधी रुपयांची रस्ते, आरोग्य व मूलभूत विकास कामांना दिलेली स्थगिती शासनाने तातडीने उठवावी ....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतीनीधी।
राज्यातील ग्रामीण भागात रस्ते आरोग्य शिक्षण इत्यादी मूलभूत सुविधांना प्राधान्याने अग्रक्रम देणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारने माढा विधानसभा मतदारसंघातील अर्थसंकल्पात मंजूर परंतु अद्याप प्रारंभ न झालेल्या कामावरील व तसेच 2515 योजनेअंतर्गत स्थगित करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे तसेच टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालय, कामाची स्थगिती उठून ग्रामीण भागातील विकासाला अधिक चालना द्यावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व संबंधित मंत्रिमहोदयाकडे केलेली आहे
माढा विधानसभा मतदारसंघात माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामासाठी 17 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे .कांही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे तर काही ठिकाणच्या कामांच्या निविदा जाहीर केलेल्या असूनही अशा कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे, मंजूर कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रके तयार करून तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे व ही कामे निविदा स्तरावर असून शासनाची मंजुरी असूनही अशा कामांची स्थगितीमुळे पुढील कार्यवाही थांबलेली आहे. माढा तालुका हा ग्रामीण भागाचा असून रस्त्यांची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेले आहे, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर जनतेसाठी दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागातील रस्ते होणे काळाची गरज आहे.
टेंभुर्णी येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, सध्याच्या प्राथमिक रुग्णालयाची जागा कमी पडते, प्रवेशद्वार व्यवस्थित नाही व इतरही सोयीसाठी अनुकूलता नसल्यामुळे टेंभुर्णी येथील पाटबंधारे खात्याची वसाहती शेजारची दोन एकर जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी घेतलेली आहे. यासाठी रेडी रेक्लेमेशन नुसार आरोग्य खात्याने पाटबंधारे खात्याला एक कोटी पन्नास लाख रुपये भरणे आहेत, यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार बबनदादा शिंदे यांनी पाठपुरावा करून सदर रक्कम शासनाने भरावी किंवा माफ करावी म्हणून पाठपुरावा केला होता व त्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिलेली आहे परंतु याबाबत अद्यापही पुढील कारवाई झालेली नाही., या रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे ही सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर गोष्ट आहे असे विचार आमदार शिंदे यांनी व्यक्त केले आहेत.
.
चौकट........
माढा विधानसभा मतदारसंघात मागील 25 वर्षापासून आम्ही विकासाची कामे केलेली आहेत व शेतकरी, शेतमजूर ,ग्रामीण भागातील जनता यांचे आर्थिक जीवनमान त्याचे आरोग्य,शिक्षण व त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सातत्याने लक्ष दिले आहे. सध्या ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाची स्थगित झालेली रस्त्याची कामे देखील आम्ही शासनापुढे मांडून व त्या कामाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करून शासनाकडून निधी उपलब्ध करून आणलेला आहे, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शासनाने दिलेली स्थगिती उठवावी व लवकरात लवकर कामे पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत आम्ही सर्वांचे स्वागतच करू.
लोकाभिमुख होणाऱ्या सुधारणा व त्यांच्यासाठी होणारी कामे ही कोणत्याही एका पक्षासाठी नसतात, याचा उपयोग सर्वच नागरिकांना होत असतो . राजकारणापुरतं राजकारण ठेवून समाजकारणाला सर्वांनी मोठ्या मनाने प्राधान्य द्यावे व सर्वानी या मतदारसंघांमध्ये जनतेच्या विकासाची कामे व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिल्यास आम्हालाही आनंद वाटेल.
....।।।।।।।।आ.बबनदादा शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा