Breaking

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या "जागरूक पालक सुदृढ बालक" या मोहिमेचा शुभारंभ...



सार्वजनिक आरोग्य विभागाच्या "जागरूक पालक सुदृढ बालक" या मोहिमेचा शुभारंभ...



श्रीगोंदा-नितीन रोही,

 सदर मोहिमे अंतर्गत सुनंदा ताई होनराव विद्यालयात 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थीनिंची श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नविन यादव,डॉ. अभिजित तिवाटने,डॉ. विजय काळे, डॉ. सुषमा जंजिरे यांनी तपासणी केली.यावेळी मुख्याध्यापक सौ. वणपुरे मॅडम,श्री. बी.टी.मखरे सर,श्री भोसले सर यांनी सहकार्य केले. सुमारे 9 आठवडे चालणाऱ्या या मोहिमअंतर्गत शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करून दोष किंवा गंभीर आजार व्याधी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रूग्णालय श्रीगोंदा येथे संदर्भित करून पुढील तपासण्या व उपाचार केले जातील. त्याकरीता सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या योजनेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व उपचार यांचा मोठया प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगोंदा ग्रामीण रूग्णालयच्या वतीने वैद्यकिय अधिक्षक सौ.डॉ. सविता ससाणे व डॉ. नविन यादव यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा