*टेंभुर्णी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्तीच्या मैदानात*
*सिकंदर शेख हर्षवर्धन सदगीर यांची कुस्ती बरोबरीत सुटली*
कन्हेरगाव/ प्रतिनिधी
टेंभुर्णी : -शनिवार वेळ रात्री १०.४५ ची उत्कंठा अतिशय शिगेला पोहचलेली.शिवतीर्थ मैदान खचाखच तुडुंब भरलेले.मंत्रीमहोदय ना.उदय सामंत व ना.शंभूराजे देसाई यांची प्रमुख उपस्थिती.सर्वांच्या नजरा भारत केसरी पै.सिकंदर शेख व महाराष्ट्र केसरी पै.हर्षवर्धन सदगीर यांच्यावर खिळलेल्या.दोघात अर्धा तास घमासान कुस्ती झाली.डाव-प्रतिडाव झाले,प्रचंड झटापट झाली.समालोचक युवराज केचे व धनाजी मदने यांच्या उत्कृष्ठ निवेदनाने प्रचंड उत्साह निर्माण झालेला.तरीही कुस्तीचा निकाल लागेना.शेवटी संयोजक संजय कोकाटे यांनी उपस्थितीतांना विचारले काय करू.सर्वांचा प्रतिसाद कुस्ती निकाली करा पुन्हा पाच मिनिटं झाली कुस्ती निकाली होईना.दोन वेळा वेळ वाढवून दिला पण उपयोग झाला नाही.शेवटी रावसाहेब मगर व बासूभाई मुलाणी आदींच्यातील चर्चेनंतर पै.सिकंदर शेख व पै.हर्षवर्धन सदगीर यांच्यातील लांबलेली कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
टेंभुर्णीतील शिवतीर्थ मैदानावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष संजय (बाबा) कोकाटे यांच्या वतीने शनिवारी दुपारी ३.०० वा.पासून जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व उत्पादन शुल्क व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या.यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या तुफानी कुस्ती साजऱ्या झाल्या.प्रमुख कुस्तीचे पंच म्हणून मल्ल सम्राट अस्लम काजी,छोटा रावसाहेब मगर व स्वतः संजय (बाबा) यांनीही काम पाहिले.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय शिंदे यांच्यात यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या कुस्तीत पैलवान माऊली कोकाटे यांनी बाजी मारली.तिसरी मोठी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व दिल्ली-हरियाणा येथील पैलवान गौतम यांच्यात झालेल्या तुंबळ कुस्तीमध्ये पैलवान महेंद्र गायकवाड याने बाजी मारली.पैलवान संतोष जगताप व पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यातही रंगतदार कुस्ती झाली.ही कुस्ती शेवटी बरोबरीत सोडविण्यात आली.महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सतपाल सोनटक्के व पैलवान मनोज माने यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये सतपाल सोनटक्के विजय झाला.दुसरा महाराष्ट्र चॅम्पियन माढा तालुक्यातील टाकळी (टें) गावचा पैलवान कालीचरण सोलनकर व पैलवान श्रीनिवास पाथरूट यांच्यातील कुस्तीही बरोबरीत सोडविण्यात आली.शेवटची मोठी कुस्ती बेंबळे पैलवान तोसीब मुलाणी व पैलवान महेश बिचकुले यांच्यात झाली.कुस्तीमध्ये पैलवान महेश बुचकुले याने बाजी मारली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत,सोलापूर जिल्हा मंडळाचे सद्स्य तथा भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,रयत क्रांती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील,इतिहास संशोधक प्रा.डॉ.श्रीमंत कोकाटे,भाई बाळासाहेब पाटील,महेश साठे,महेश चिवटे,अतुल खूपसे,प्रदीप जगदाळे,बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विनोद पाटील,अमोल जगदाळे,सुधाकर कवडे,पोपट अनपट, आदीजन उपस्थित होते.
पै.युवराज केचे व पै.धनाजी मदने यांनी कुस्तीचे उत्कृष्ठ व अचूक समालोचन करून उपस्थितांची मने जिंकली.
*** अंतिम कुस्ती सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय कोकाटे यांना व्यस्त कामकाजामुळे कार्यक्रम येऊ शकलो नाही.मात्र पुढील कार्यक्रमास येण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी कुस्ती स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री शिंदे यांचा फोन मेसेज उपस्थिता पर्यंत स्पीकरवरून प्रसारित करण्यात आला.
* संजय (बाबा) कोकाटे यांच्या कडून सन २००८ नंतर दुसऱ्यांदा मोठ्या कुस्त्यांचे आयोजन
*गॅलरीतुन कुस्ती पाहण्याची टेंभुर्णीत पहिल्यांदाच सोय
* शिवतीर्थ मैदानावर कुस्ती शौकिनांचा तुफान प्रतिसाद
*दिल्ली,हरियाणा आदी राज्यातून मल्ल व कुस्ती शौकिनांची हजेरी.
*राज्यातून व परराज्यातून आलेल्या अनेक मोठ्या मल्लांचा मैदानावर सन्मान
*** महाराष्ट्र केसरी पैलवानास आयएएस,आयपीएस पेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात.यामुळे पदवीधर महाराष्ट्र केसरी झालेल्यास थेट पोलीस उपअधीक्षक व पदवीधर उपमहाराष्ट्र केसरी झालेल्यास थेट पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती द्यावी अशी मागणी संजय कोकाटे यांनी यावेळी आपल्या भाषणातून शासनाकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा