Breaking

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

वृत्तपत्र विक्रेते बिभीषण पवार यांचे निधन ....


वृत्तपत्र विक्रेते बिभीषण पवार यांचे निधन  ....



बेंबळे।प्रतिनिधी                       

                 बेंबळे येथील बिभीषण आगतराव पवार (वय 51) यांचे मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अल्पशा आजारांने निधन झाले .सोलापूर जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व दैनिकांचे स्वर्गीय बिबीशण पवार हे बेंबळे येथील वृत्तपत्र विक्रेते म्हणून सर्व परिचित होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे. बिभीषण पवार हे अतिशय प्रेमळ, लोभस आणि सर्वांना कोणत्याही कार्यात मदत करणारे  म्हणून 'हवे हवे से' व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अल्पायुषी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भीमा नदीच्या तीरावर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा