Breaking

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश सचिवपदी शब्बीर जहागिरदार यांची निवड*



*राष्ट्रवादी काँग्रेस च्या  प्रदेश सचिवपदी शब्बीर जहागिरदार यांची निवड*


टेंभुर्णी/प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सचिव पदी शब्बीर बाबासाहेब जहागीरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे
 या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान-पठाण यांनी दिले आहे. 
   आमदार बबनराव शिंदे , करमाळा आमदार संजयमामा शिंदे , जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी या निवडीबद्दल शब्बीर जहागीरदार यांचे अभिनंदन केले आहे. 
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय व धोरणे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पक्षकार्य करणार असल्याचे शब्बीर जहागिरदार यांनी आज जगदंबा प्युअर व्हेज टेंभुर्णी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील , टेंभुर्णी चे माजी उपसरपंच श्रीकांत लोंढे , शाहजमान जहागिरदार , तनवीर मुलानी , शिराज तांबोळी , सचिन होदाडे आदी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा