श्री शारदेय गुरुकुल मध्ये वीरांगणांचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा .
श्री. लक्ष्मणराव देशमुख ( गुरुजी) बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल टेंभुर्णी आयोजित वीरांगणा 2023 मधील स्पर्धाचे तसेच भाग्यवान विजेत्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौं.हर्षवर्धन प्रियंका देशमुख या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून प्रशालेच्या प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे व वीरांगणांचे स्वागत करण्यात आले. स्कुलच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर स्वागत गीत प्रस्तुत केले. यानंतर प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनी सर्व मान्यवरांना शालेय कामकाज कशा पद्धतीने चालते याबद्दलची माहिती देत सर्वाना शालेय परिसर दाखवला. प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांना प्रशालेमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी, प्रशालेतील सोयी, सुविधा, शिक्षण - प्रशिक्षण याबद्दलची सर्व माहिती देण्यात आली.यानंतर सर्व वीरांगणांचा सत्कार व बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. संस्थेच्या संचालिका सौ प्रियांका हर्षवर्धन देशमुख यांनी उपस्थित सर्व वीरांगणांना संबोधित केले यासारखे कार्यक्रम पुन्हा व्हावे यासाठी महिलांनी विशेष आग्रह धरला. या आग्रहापोटी संस्थेच्या संचालिका सो प्रियांका हर्षवर्धन देशमुख मॅम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेऊ असा शब्दही दिला. सर्व विरांगणांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना, पाहुण्यांना तसेच विरांगणा व त्यांच्या कुटुंबीयांना अल्पउपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन शक्ती सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप बोधक सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रशालेचा सर्व शिक्षक स्टाफ व इतर सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली यामुळे कार्यक्रम यशस्वी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा