*तुळजापूर शहरातील अवैद्य धंदे बंद करावे या मागणीसाठी दलीत युवक आंदोलनचे जिल्हाध्यक्ष यांचे अमरण उपोषण*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर शहरातील अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी दलीत युवक आंदोलन महाराष्ट्र राज्य,जिल्हाअध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कांबळे यांनी आज दिनांक,३० जानेवारी २०२३, पासून तुळजापूर तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापनास तीर्थ,शासकीय विश्रामग्रह व्ही,आय,पी,मार्गावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे, पापनास तलाव लगत असणाऱ्या मंदिर संस्थांच्या जागेवर खरेदीखत कशाच्या आधारे केले त्याची तात्काळ चौकशी करा, जर ती खरेदी योग्य असेल तर तेथील शेजारी शेड मारून राहणाऱ्या गरीब लोकांना किमान भोगवट दाराचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे,तसेच तुळजापूर शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी दलित युवक आंदोलनचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कांबळे हे आमरण उपोषणास बसले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा