Breaking

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

बृहनमठ वेळापूर शाखा टेंभुर्णी सभागृहाचा समाजाला चांगला उपयोग होईल - आ. बबनराव शिंदे.



बृहनमठ वेळापूर शाखा टेंभुर्णी सभागृहाचा समाजाला चांगला उपयोग होईल -  आ. बबनराव शिंदे.    



 आ.बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते झाले लोकार्पण. 


  टेंभुर्णी (प्रतिनिधी )बृहनमठ वेळापूर शाखा टेंभुर्णी सभागृहाचा समाजाला चांगला उपयोग होईल या सभागृहासाठी 13 लाख रुपयाचा निधी दिला होता परंतु समाजाने एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करून घेतले आहे त्यामुळे ही इमारत अतिशय सुसज्ज व सुंदर झाली आहे अशा पद्धतीने जनतेच्याच पैशाचा विनियोग झाल्यास मनास समाधान मिळते आजपर्यंत टेंभुर्णी मध्ये 16 विविध सभामंडप दिले आहेत तर तालुक्यात 400 सभामंडप दिले आहेत टिळक रोड येथील नागरिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे पैसे दिले येथे चांगले काम झाले आहे असे प्रतिपादन लोकार्पण सोहळ्याच्या वेळी आमदार बबनराव दादा शिंदे यांनी केले बृहनमठ वेळापूर शाखा टेंभुर्णी येथील आमदार फंडातून बांधलेल्या सभागृह बांधकामाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते 
यावेळी वेळापूर मठाचे श्रीगुरु शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी, उत्तराधिकारी शिवराज शर्मा महास्वामी, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे, शिवाजीराव पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील सरपंच प्रमोद कुटे, उपसरपंच धनंजय गोंदील विजयकुमार मिरगे, बाळासाहेब  
 धाईंजे ,महिंद्र वाकसे , अँड संतोष कानडे, गिरीश ताबे,  बाळासाहेब बोराटे, अनिल तोडकर,  पंचाक्षरी होदाडे ,रमेशकथले ,राजाभाऊ तोडकर ,वैभव तळे ,पपेश पाटील दीपक व्यवहारे , संदीप मोकाशी, महारुद्र टोंगळे सर, भास्कर सोनवणे , शेखर ताबे, गजानन ताबे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन होदाडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी निधी दिल्याबद्दल आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले तर यावेळी शिवराज शर्मा स्वामी, तुकाराम ढवळे, योगेश बोबडे प्रमोद कुटे, बाळासाहेब धायंजे, शिवाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिळक रोड येथील पांडुरंग कानडे, महादेव स्वामी, बाळासाहेब भोज, गणेश भोज, गणेश स्वामी, रेवन क्षीरसागर ,सतीश होदाडे, संजय होदाडे ,बालाजी गवळी, औदुंबर कथले, प्रसाद कथले, अक्षय स्वामी, राजदीप कानडे ,साहिल ताबे ,शुभम शिवपूजे आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले  यावेळी रेणुकाचार्य रुद्र महिला मंडळ यांचे महिला सदस्य ,टिळक रोड येथील स्त्री पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मुळे व श्रीकांत लोंढे यांनी केले चौकट करा  - बोलत असताना आमदार साहेबांनी मठाची पाठीमागे अजून जागा शिल्लक आहे व त्या ठिकाणी चांगले सांस्कृतिक भवन होऊ शकते हे लक्षात घेऊन अजून पंधरा ते वीस लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांचा गजर करत समाधान व्यक्त केले तसेच यावेळी इमारत बांधते वेळी पडेल ते काम करणाऱ्या बाल गोपाळांचा सन्मान करण्यात आला .   चौकट 2- आमदारनी बोलताना  टेंभुर्णी नगरपंचायत होण्यास काही अडथळे निर्माण झाले आहेत दरम्यानच्या काळात ग्रामपंचायती ची निवडणूक लागल्यास सर्वपक्षीय बहिष्कार टाकण्याची सूचना केली यामुळे टेंभुर्णी शहरात परत एकदा ग्रामपंचायत की नगरपंचायत होणार या बाबत चर्चा चालू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा