टेंभुर्णी शहरासह तालुक्यातील नवीन निवड करून निवडणुका लढवणार- ऋषिकेश बोबडे
बेंबळे ।प्रतीनीधी।
टेंभुर्णी व मोडनिंब शहरासह माढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे,माजी आमदार धनाजी साठे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डा.धवलसिंह मोहिते-पाटील व युवक नेते दादासाहेब साठे यांचे मार्गदर्शनाखाली करून आगामी येणारे टेंभुर्णी नगरपंचायत अथवा ग्रामपंचायत ही निवडणूक समविचारी पक्षाची मोट बांधून जिंकण्याचा साठी प्रयत्न करणाराअसल्याचे मत माढा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे पत्रकार परिषदेत मांडले.
पुढे बोलताना बोबडे म्हणाले की माढा तालुका काँग्रेस चे माझी अध्यक्ष व काही पदाधिकारी मागील आठवड्यात देशाचे नेते सुशिलकुमार शिंदे याची भेट घेऊन मला शिंदे साहेबांनी काम चालू ठेवण्यास सांगितले असल्याचे सांगतात.व काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी कोणालाही विश्वासात न घेता नवीन पदाधिकाऱ्याच्या निवडी केल्या असल्याच्या बातम्या विविध दैनिकात प्रसिद्ध केल्या आहेत व तोंडी सांगत फिरत आहेत यामुळे पक्षातील कार्यकर्त्यासह जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. परंतु दि.२९ डिसेंबर 2022 रोजी माझ्यासह नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रियेतून झालेल्या आहेत. असे पत्र काँग्रेस कमिटीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. परंतु सुशील कुमारजी शिंदे साहेबांनी माजी तालुकाध्यक्षांना काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदावर काम करण्यासस सांगितले की पक्षाचे काम करण्यास सांगितले हे त्यांनी प्रथम जाहीर करावे.असे आव्हान बोबडे यांनी केले.तर मी काँग्रेस कमिटीचा तालुकाध्यक्ष असल्याने माढा तालुक्यातील येणाऱ्या टेंभुर्णी नगरपंचायत असेल अथवा ग्रामपंचायतची निवडणूक माजी आमदार धनाजी साठे,युवक नेते दादासाहेब साठे,यांचे मार्गदर्शनाखाली समविचारी पक्ष व संघटनांचे सोबतीने अथवा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे व तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी निवड दिनांक 29 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रक्रियेतून झाली असल्याचे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा