Breaking

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांची कारवाई.”


जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांची कारवाई.”

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करणे कामी दि.07.02.2023 रोजी रवाना होवून तुळजापूर येथे चक्री नावाचे जुगार खेळत व खेळवीत असणारे इसमांची खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा.एम.रमेश सहा.पोलीस अधिक्षक उपविभाग कळंब यांना सदरची माहिती देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जी.पी. पुजरवाडा,पोलीस स्टाफसह तुळजापूर बसस्थानक बाजूचे क्रांती चौकातील सिध्दी लॉजचे बाजूचे रुममध्ये 16.20 वा.सु. छापा टाकला असता तेथे चक्रीनावाचे जुगार खेळत असतांना खालील इसम मिळून आले. 1. महेश नानासाहेब भोसले, वय 30 वर्षे, 2. दिनेश नानासाहेब भोसले, वय 33 वर्षे, रा. क्रांतीचौक,ता तुळजापूर, 3. सूधील अर्जुनसिंह ठाकुर, वय 25 वर्षे, रा. टाकविकी, ता. तुळजापूर, 4. सुरेश कोडींबा घाडगे, वय 25 वर्षे, रा.वेताळनगर, तुळजापूर  हे सर्व लोक चक्री जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले.त्यांच्याकडे रोख रक्कम 35,320 ₹ व जुगाराचे साहित्यासह 1,03,100 ₹ तसेच दुसऱ्या ठिकाणी जुन्या बसस्थानक समोर सागर हॉटेलचे पाठीमागे कॉम्पलेक्सच्या एका रुममध्ये 17.05 वा. सु. छापा टाकला असता तेथे चक्रीनावाचे जुगार खेळत असतांना खालील इसम मिळून आले. 1. अनिल मरगु पवार, वय 36 वर्षे,रा. वडारगल्ली तुळजापूर, 2.अहमद जफर शेख, वय 44 वर्षे, रा. शुक्रवारपेठ तुळजापूर, 3. समाधान रमेश धुमाळ, वय 21 वर्षे, रा.खंडाळा ता. तुळजापूर त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम 20,460 ₹ जुगाराचे साहित्यासह 38,000 ₹ तसेच ‍ ‍तिसऱ्या ठिकाणी जुन्या बसस्थानक समोर जगदंबा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील रुममध्ये 17.50 वा. सु . छापा टाकला असता तेथे चक्रीनावाचे जुगार खेळत असतांना खालील इसम मिळून आले. 1. मयुर मधुकर काळे, वय 21 वर्षे, रा. राम मंदीर जवळ जितूंर, 2. लक्ष्मण ज्ञानदेव माळी, वय 32 वर्षे, रा.अपसिंगा ता. तुळजापूर, 3.आकाश प्रकाश पवार, वय 27 वर्षे, रा. सारोळा ता. तुळजापूर, 4. अजित अशोक काबंळे, वय 26 वर्षे, रा. मातंगनगर तुळजापूर, 5.विश्वजीत पोपट कांबळे, वय 26 वर्षे, रा.ढेकर ता. तुळजापूर  त्यांच्याकडे रोख रक्कम 18,820 ₹ जुगाराचे साहित्यासह 38,000 ₹ 21,700 ₹असे एकुण तीन ठिकाणी तुळजापूर शहरात चक्री नावाचे जुगारावर छापे टाकले असता छाप्यात एकुण रोख रक्कम 2,37,400 ₹ मुद्देमाल मिळून आला. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 4, 5 अंतर्गत तुळजापूर पो. ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
       सदरची  कामगिरी  मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहा.पोलीस अधीक्षक- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री पुजरवाड, पोलीस अंमलदार सादिक शेख,नवनाथ खांडेकर,श्रीकांत भांगे, विठ्ठल गरड, किरण अंभोरे यांच्या पथकाने केली आहे.

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा