*दिलीपराव भोसले युवा प्रतिष्ठान मार्फत शिवजन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन.*
*तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला टी-शर्ट देऊन "व्यसनमुक्ती शपथ" देण्याचे नियोजन.*
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चे निमित्त साधून दिलीपराव भोसले युवा प्रतिष्ठान मार्फत शिवजयंती चे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक संदेशा बरोबरच हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीने पार पडणार आहे. यामध्ये ढोल, ताशे, लेझीम,रांगोळ्या काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. अधिक सविस्तर माहिती देताना प्रतिष्ठानचे आयोजक युवा उद्योजक अविनाश भोसले असे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व युवकांना एकत्रित करून सर्वांना व्यसनमुक्ती शपथ देण्यात येणार आहे.
याप्रसंगी युवकांना महाराजांच्या फोटो असलेला टी-शर्ट वाटप करण्यात येणार आहे. येत्या 19 तारखेला संध्याकाळी चार ते दहा या वेळेत भोसलेवाडी बेंबळे येथे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अविनाश भोसले यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा