*चव्हाणवाडी ग्रामस्थांच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांचा सत्कार*
टेंभुर्णी प्रतिनिधी/
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पो.नि. राजेंद्र निंबाळकर गेल्या दीड वर्षापासून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चांगले काम करत असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी टेंभुर्णी परिसरातील अनेक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत होते.
याच वाढदिवसाचे अवचित साधून मा. कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्यासह चव्हाणवाडी येथील मा. सरपंच व बबनराव शिंदे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक मिस्कीन, राष्ट्रवादी युवक चे माढा तालुका उपाध्यक्ष संजय मिस्कीन
यांनी शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप , पत्रकार सतीश काळे ,जयलिंग रायचूरे प्रवीण नागरे, महेश पवार, सुरज काझी ,विशाल मिस्किन बाळासाहेब नांगरे ,अजित (दादा ) मिस्किन ,दीपक चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा