विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ....
1एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन ...
मतदार संघातील 165 गावातून उपक्रमराबवणार ..
प्रधानमंत्रीआयुष्यमानभारत कार्ड मिळऊन देणार...
....... आ. बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
खासदार शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय संस्कृती मंडळ निमगाव( टे.) आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुका 108 गावे , मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावे व माळशिरस तालुक्यातील 14 गावातून 1 एप्रिल ते ते 30 एप्रिल 2023 पर्यंत मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्डचे वाटप असा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रंणजीत भैया शिंदे माढा तालुका पंचायत समितीचे सभापती विक्रम दादा शिंदे जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोल्हे माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे शंभूराजे मोरे शिवाजी पाटील आप्पा उबाळे बंडू नाना ढवळे कृषी उत्पन्नचे सुहास पाटील तसेच दीपक पाटील संतोष अनभुले आदी मान्यवरासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते .
अधिक माहिती देताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी निदान व उपचार आणि पाच लाख रुपये पर्यंत उपचाराच्या खर्चासाठी चे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड वाटप शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावात सर्वांना सोईच्या अशा ठिकाणी नियोजित तारखेला या शिबिराचे आयोजन होणार आहे. या साठी प्रत्येक गावात स्वतंत्र डॉक्टर्स, आशा वर्कर्स, नर्सेस यांचे सहित कारखान्याचे कर्मचारी व गावातील सर्व कार्यकर्ते नागरिकांना मदत करणार आहेत. ग्रामीण भागात अनेक नागरिकांना माहीत नसते की आपणास कोणता आजार आहे व शेवटी आजाराचे प्रमाण वाढल्यानंतर कुटुंबात अडचणी निर्माण होतात म्हणून कारखाना कर्मचारी व कार्यकर्ते 40 वयाच्या पुढील सर्व नागरिकांना या शिबिरात तपासणी करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. शिबिरामध्ये रक्तदाब,व रक्तातील साखर यांची मोफत तपासणी करण्यात येणार असून यासाठी अध्यायवत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. चाळीस वयाच्या च्या पुढील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी तपासणी करावी असे आव्हान करण्यात येत आहे. आजार जास्त गंभीर असल्यास त्या रुग्णास प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देऊन तातडीने पाच लाख रुपये खर्चापर्यंतच्या उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा सल्ला देण्यात येणार आहे, यासाठी संबंधित व्यक्तीने आधार कार्ड व मोबाईल लिंक करणे आवश्यक राहणार आहे.
यावेळी रणजीत भैय्या शिंदे यांनी देखील संबंधित शिबिराच्या अनुषंगाने उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले व गावच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवावा असे आव्हान केले.
** अनेक प्रश्नावर चर्चा **
या कार्यक्रमास गावोगावचे सरपंच व शेकडो कार्यकर्ते यांनी आपापल्या भागात होत असलेल्या 2515 योजनेतील कामाच्या दिरंगाई बद्दल तसेच आपल्या विभागातील रस्ते ,पाणी, आरोग्य, वीज बिल, पाणीपट्टी आदी संदर्भातील अडचणी विषयी आमदार बबनदादा शिंदे व रणजीत भैय्या शिंदे यांचे बरोबर चर्चा केली ,त्यांना दादा व भैय्यांनी सर्व अडचणी सोडवणे विषयी सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली. निराधार योजना श्रावणबाळ योजना विधवा व अपंगांना सहकार्य तसेच ग्रामपंचायत मार्फत विविध विकास योजना राबवून नागरिकांना सहकार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आ.बबन दादांनी आव्हान केले.
... बृहत आराखडा तयार करा....
या प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की शासनाने 2021 ते 2041 या वीस वर्षाच्या कालावधीसाठी 'ग्रामीण विभाग बृहत आराखडा' तयार करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी प्रत्येक गावच्या परिसरातील वाड्यावस्यावरील चांगले रस्ते करणे व इतर सर्व सुविधा त्या वस्तीवर पुरवणे असे नियोजन आहे. यासाठी संबंधित वस्ती संदर्भात ग्रामपंचायतीमार्फत ठराव करून रस्ते ,वीज ,पाणी, शिक्षणाची सोय व आरोग्य या सर्व संदर्भातील माहिती कळवणे आवश्यक आहे. रस्त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करून उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवणे आवश्यक ठरणार असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले .
या कार्यक्रमास माढा मतदारसंघातील बचत गटाच्या प्रमुख महिला, सामाजिक कार्यकर्त्या, महिला ग्रामपंचायत सदस्य व सरपंच तसेच कारखान्याचे संचालक, विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी व अनेक गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा