Breaking

शनिवार, ४ मार्च, २०२३

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना .......पिंपळनेर व करकंब दोन्ही युनिट मधून 21 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप.... ...वीस लाख क्विंटल साखरेचे उत्पादन... मार्च अखेरपर्यंत 25 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट...। .......। आमदार बबनदादा शिंदे .



विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना .......
पिंपळनेर व करकंब दोन्ही युनिट मधून 21 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप....
 ...वीस लाख क्विंटल साखरेचे उत्पादन...
 मार्च अखेरपर्यंत 25 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट...  .......। आमदार बबनदादा शिंदे


 ..दहा कोटी युनिट वीज निर्मिती ..
... दोन कोटी 50 लाख लिटर इथेनॉल निर्मिती 
...दहा दिवसाला २३५०रु.प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा ...
आतापर्यंत ऊस बिलाचे 505 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले....
...16 फेब्रुवारीपासून 75 रुपये व एक मार्चपासून दीडशे रुपये प्रति टन वाढीव ऊस बिल...


 बेंबळे ।प्रतिनिधी aj 24taas news  मुकुंद रामदासी      .    

                           

        विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर (ता. माढा )येथील युनिट  एक व करकंब (ता. पंढरपूर) येथील युनिट  दोन यामधून आतापर्यंत एकुण 21 लाख 73 हजार 801 मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून 20 लाख 13 हजार 850 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. पिंपळनेर युनिट मधे मार्च अखेर पर्यंत तर करकंब युनिट  दहा ते बारा मार्चपर्यंत गळीत हंगाम सुरू राहील व दोन्ही युनिटमध्ये एकूण 25 लाख मेट्रिक टन ऊस गाळप निश्चित होईल असे प्रतिपादन या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. याप्रसंगी व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव व कारखान्यातील  इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

       सविस्तर वृत्तांत असा की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट एक पिंपळनेर च्या गळीत हंगामाला 134 दिवस पूर्ण झाले असुन करकंब युनिट दोन ला 133 दिवस पूर्ण झाले आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्यापही दोन लाख पन्नास हजार मे.टन ऊस  शिल्लक असून पिंपळनेर युनिट एक मध्ये प्रतिदिन सरासरी 12 हजार मे.टन तर करकंब युनिट दोन मध्ये सरासरी 2500 मे. टन उसाचे गाळप करण्यात येत आहे. पिंपळनेर युनिट एक, मार्च अखेरपर्यंत चालेल व कारखाना क्षेत्रात ऊस शिल्लक राहणार नाही, तर करकंब युनिट दोन साधारण 10 मार्च पर्यंत हंगाम चालेल अशी माहिती कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी दिली आहे. 
.. चौकट .. दहा कोटी युनिट विज निर्मिती 
            विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक च्या 38 मेगा वॅट सहवीज निर्मिती प्रकल्पा (को जनरेशन प्रोजेक्ट) मधून आतापर्यंत 6 कोटी 55 लाख 97 हजार 500 युनिट वीज निर्मिती करण्यात आलेली असून करकंब युनिट दोन मधून तीन कोटी 87 लाख 56 हजार 800 युनिट वीज निर्मिती करण्यात आलेली आहे. दोन्ही युनिटमध्ये एकूण दहा कोटी 43 लाख 54 हजार 300 युनिट वीज निर्मिती करण्यात आलेली असून यातील कारखान्यासाठी विजेचा वापर करून उर्वरित वीज महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला निर्यात करण्यात येते . 
 चौकट .... दोन कोटी 50 लाख लिटर इथेनॉल
             विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर युनिट एक मध्ये 150 के.एल.पी.डी.( किलो लिटर पर डे) क्षमतेचा आसवानी प्रकल्प (डिस्टिलरी) कार्यान्वित असून आत्तापर्यंत दोन कोटी 50 लाख लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आलेली आहे.  कंपन्यांच्या मागणीनुसार इथेनॉलचा पुरवठा करण्यात येतो.
 चौकट... शेतकऱ्यांना 2350 रुपये  प्रति टन प्रमाणे दहा दिवसाला ऊस बिल. 16 फेब्रु.पासून 75 व 150 रुपये प्रति टन वाढीव दर
...... पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन मध्ये गळितास आलेल्या उसाला आतापर्यंत 2350 रुपये प्रति टन प्रमाणे पहिले बिल ,प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे .16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत येणाऱ्या ऊसाला 75 रुपये प्रति टन म्हणजेच प्रति टन 2425 रुपये तर एक मार्चपासून पुढे येणाऱ्या उसाला प्रति टन १५० रुपये म्हणजेच प्रति टन 2500 रुपये वाढीव दराने बिल देण्यात येत आहे. आतापर्यंत या कारखान्याने शेतकऱ्यांना गळीतास आलेल्या ऊस बिलापोटी एकुण ५०५ कोटी रुपये दिलेले आहेत.,शेतकऱ्यांना दहा दिवसाला ऊस बिल देणारा राज्यातील विठ्ठलराव शिंदे हा एकमेव साखर कारखाना आहे हे निश्चित.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा