मकाई सहकारी साखर कारखान्याची थकीत ऊस बिलाची रक्कम येथे 15 एप्रिल पर्यंत सभासदाच्या खात्यात जमा होणार,,,,,,, चेअरमन दिग्विजय बागल यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी- मकाई सहकारी साखर कारखान्याचे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांचे गळीत हंगाम 2022- 23 मधील 4 पंधरवड्याची ऊस बिलाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. सदरची देय असलेली ऊस बिलाची रक्कम उपलब्ध करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून लवकरच बँक प्रकरण मार्गी लागणार आहे. सध्या मार्च महिना सुरू असल्याने बँकेच्या वर्ष अखेरच्या कामकाजामुळे एप्रिल 2023 च्या पहिल्या आठवड्यात कर्जाची रक्कम कारखान्याच्या खात्यावर जमा होणार असून 15 एप्रिल पर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम सर्व ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते श्री बागल यावेळी बोलताना पुढे म्हणाले की आर्थिक अडचणीमुळे ऊस बिल देण्यास विलंब होत आहे. त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करत असल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले. व सर्व सभासदांनी आजवर आमच्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल ऋण व्यक्त करून या पुढील काळातही सर्वांनी आम्हाला अशाच पद्धतीचा विश्वास आणि सहकार्य ठेवण्याचे आवाहन चेअरमन दिग्विजय बागल यांनी शेवटी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा