Breaking

बुधवार, १ मार्च, २०२३

वैज्ञानीक दृष्टीकोण अंगी* *बाळगल्यास माणूस डोळस बनतो* : *अँड.अजय वाघाळे*



*वैज्ञानीक दृष्टीकोण अंगी* *बाळगल्यास माणूस डोळस बनतो* : *अँड.अजय वाघाळे* 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

धाराशिव दिंनांक २८/०२/२०२३ रोजी भाई उद्धवराव पाटील प्रशाला उस्मानाबाद येथे  २८ फेब्रुवारी राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित चमत्कारा मागील विज्ञान व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला ,कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ....शाळेच्या 
मुख्याधिपिका
 नलावडे मॅडम, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अँड.अजय वाघाळे...अंनिस शहर अध्यक्ष सिदेश्वर बेलुरे,अंनिस जिल्हा प्रधान सचिव वामनराव पांडगळे, जेष्ठ साहित्यिक विजय गायकवाड,हे होते शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला, यावेळी चमत्कार मागील विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण अँड.अजय वाघाळे,यांनी केले,चमत्कारामागील विज्ञान 'या कार्यक्रमाच्या सुरुवातीला
बीन वातीचा पाणी घालून दिवा प्रज्वलीत करुन उद्घाटन केले. प्रशालेच्या मुख्याधिपिका यांच्या हस्ते  करण्यात आले, चमत्कारा मागील विज्ञान व त्यामागील अंधश्रद्धा या विषयी मुलांना प्रबोधन करताना त्यांनी चमत्कारावर आधारित विज्ञानाचे प्रयोग सादर केले त्यामध्ये साखळदंड तोडणे, पाण्यावर दिवा पेटवणे ,कलशामध्ये वेगवेगळ्या नद्यांचे पाणी काढणे,प्रश्न चिन्हावरती बॅलेंसिंग करणे, एकादिशेमध्ये दोरी वळवणे,करणी भूत भानामती  या मागील अंधश्रद्धा याविषयी प्रबोधन केले,तसेच जादु टोना प्रतिबंधक अधिनियम 2013 बदल माहिती सांगतांना म्हणाले की भारतीय राज्य घटनेने प्रत्यक नागरिकांना श्रद्धा उपासनाचे स्वातंत्र्य आहे,
परंतु श्रद्धेच्या नावाखाली समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणे, करणी, भूत,भानामती ,यांची भीती दाखवून आर्थिक प्राप्ती करणे, शारिरीक मानसिक व्यक्तीवर अघोरी उपचार करणे, साप, विंचू ,कुत्रा चावल्यास विष उतरविण्याचा दावा करणे,गुप्तधनाच्या हव्यासापोटी नरबळी, पशुबली देने,या व इतर अघोरी व अमानुष कृत्य करणे हे अंधश्रद्धा  निर्मूलन कायदयाने गुन्हा असून सात वर्षी पर्यंत शिक्षा व आर्थिक दंड असल्याचे ते म्हणाले ,जादूटोणा विरोधी कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही,उलट समाजाचे शोषण करणाऱ्या व्यक्तीला प्रतिबंध करते,असे वाघाळे 
म्हणाले,कार्यक्रमासाठी ,श्रीमती देशमुख एम बी, श्रीमती गाढवे पि के, घेवारे सर, चौरे सर, कार्यक्रमाचे प्रास्तविक नलावडे मॅडमयांनी केले तर आभार घोगरे सर यांनी मानले कर्यक्रमास
शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा