धनंज येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : तालुक्यातील धनंज (बु) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगनायक होते.जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवून स्वराज्यातून सुराज्य निर्माण करणारे महापराक्रमी शीलवान बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे असे युगनायक होऊन गेले की,त्यांच्या जन्माला आज ३९३ वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य पराक्रम आणि विचार त्यांची प्रेरणा अजूनही जिवंत आहे या थोर राजाची जयंती २९-फेब्रुवारी रोजी धनंज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हानमंत मसेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.सतेच दिवसभर शिवजन्मोत्सव समितीच्या आयोजनातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.दुपारी ३ वाजता गावातील मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पंजाबराव माळेगावे,सुभाषराव शिंदे श्री.देशमुख श्री.मुसा, श्री.अजित,श्री.श्रीगारे, श्री.चव्हाण,श्री.हंबर्डे,भुजंग मसेकर ,लक्ष्मण जोंधळे ,बापुराव शिंदे ,संदिप माळेगावे ,शरद माळेगावे ,शाहाजी शिंदे ,लक्ष्मण,केशव मुंडकर ,नागोराव मसेकर, भगवान मुंडकर ,गंगाधर निर्मळे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हानमंत मसेकर उपाध्यक्ष कृष्णा शिंदे सचिव धनाजी माळेगावे कोषाध्यक्ष आत्माराम मसेकर सदस्य सौरभ शिंदे राजू शिंदे बालाजी शिंदे योगेश निर्मळे गणेश शिंदे लखन शिंदे दीपक मुंडकर लक्ष्मण मुंडकर योगेश गंगातीरे व्यंकटेश शिंदे अरुण शिंदे विश्वनाथ मसेकर गुणवंत मसेकर गुणवंत शिंदे शंकर शिंदे वसंत मुंडकर राजू माळेगाव कांतराव शिंदे,रामदास माळेगावे यांच्यासह शेकडो शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा