*महिला दिनाचे पूर्वदिनी महिलेचा कौटुंबिक हिंसाचार* *कायद्याअंतर्गत ई- फाइलिंग प्रणाली द्वारे ई कोर्टात आँनलाईन फौजदारी* *खटला दाखल* *-विधिज्ञ अँड.श्रीनिवास कटकुर*
सोलापूर AJ 24Taas News Maharashtra
*महिलांचा कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 कलम 18 ,19, 20 ,21 ,23 या कलमांतर्गत पीडित पत्नीने पती व सासरकडील मंडळी विरुद्ध ऑनलाइन ई-फायलिंग प्रणाली द्वारे ई कोर्टात फौजदारी खटला सोलापूर येथील मे. चिफ ज्युडिशियल मँजिसेट्रेट यांच्या कोर्टात फौजदारी खटला आँनलाईन ई - फायलींग प्रणाली या सेवेचा वापर करुन फौजदारी खटला दाखल करण्यात आला. यात महिलेतर्फे अँड. श्रीनिवास कटकुर यांनी काम पाहत आहेत.*
*यात केसची सविस्तर हकीकत अशी की*
पिडीत पत्नी आश्विनी (बदललेले नाव) वय 24 राहणार , राजीव रेसीडेन्सी, विजापूर रोड, सोलापूर यांचे श्री. सोहम वय 28 यांच्याशी सन मे 2020 मध्ये विवाह झालेला होता. लग्नानंतर पती व सासरकडील मंडळी क्षुल्लक कारणावरून व अधिक सोने व पैसे मागणीसाठी सातत्याने पीडित महिलेचा अनन्वीत छळ करीत होते व त्रास जाचहाट करून सतत अपमान करीत होते. हुंडयाची रक्कम व सोने घेऊन ये म्हणून पतीने पत्नीस माहेरी हाकलुन दिले व अनेकदा पत्नीने सासरी नांदण्यासाठी प्रयत्न केले , असता पतीने नांदवुन घेतले नाही व शेवटी नाईलाजास्तव पत्नीने विधीज्ञ अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पती व सासरकडील मंडळी विरुद्ध न्याय मिळण्यासाठी ई- फायलिंग प्रणाली द्वारे ऑनलाइन सेवेचा वापर करून फौजदारी खटला मे. कोर्टात दाखल करण्यात आला , व यामुळे केस तातडीने निकाल लागण्पास मदत होणार आहे , तसेच ई कोर्टात ई फाईल केल्यामुळे न्यायालयीन कामकाज गतिमान होण्यास मदत होणार आहे व संपूर्ण भारतात न्यायालय मध्ये ही प्रणाली सुरुवात करण्यात आलेली आहे व पुढे लवकरच खटल्यांच्या सुनावणी व्हिडिओ काँन्फरसींग व्दारे केसची सुनावणी होणार आहे, त्यामुळे पक्षकरांची वेळेची व पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे व न्यायलयीन प्रक्रिया अत्यंत गतिमान होणार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा