Breaking

गुरुवार, १६ मार्च, २०२३

सारोळा येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडुंचा सत्कार, गुरूजींचा निरोप समारंभ.



सारोळा येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडुंचा सत्कार, गुरूजींचा निरोप समारंभ.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

धाराशिव: तालुक्यातील सारोळा (बु) येथील जिल्हा परिषद शाळेतील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी, खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. व शिक्षिका भोज यांना बदलीनिमित्त निरोप देण्यात आला. 
सारोळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. याबद्दल शिवकन्या खरे, आर्या रणदिवे, आकांक्षा जगदाळे, ईश्वरी खरे, जयराम मसे, विश्वजित साठे, स्वप्नील साठे, हर्षद माने, महारूद्र कुंभार, प्रणव मसे, श्लोक जाधव, अर्थव तुपीरे, विराट कासार, कैफ मुजावर, कल्याणी मिटकरी, ओम देवगिरे, राहुल सिरसट, आर्यन तुपीरे, शिवराज मिटकरी, कृष्णा कुंभार या खेळाडूंचा तर एमटीएस परिक्षेत स्नेहल रणदिवे (प्रथम), प्रगती पाटील (द्वितीय), शुभम साठे (द्वितीय) तर विज्ञान शैक्षणिक सहल परिक्षेत सोहम मसे याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले प्रशालेतील शिक्षिका श्रीमती भोज यांची बदली झाली आहे यानिमित्त शालेय व्यवस्थापन समिती व प्रशालेच्या वतीने त्यांचा साडी-चोळी देवून सत्काराने निरोप देण्यात आला कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच निर्मलाताई चंदने, उपसरपंच वैभव पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव खरे, उपाध्यक्ष दीपक रणदिवे, मुख्याध्यापक वनकळस, शारदा विद्या निकतेन हायस्कुलचे मुख्याध्यापक मुंढे, अथलेटिक्सचे जिल्हा सचिव योगेश थोरबोले, विनोद बाकले, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर माने, लक्ष्मण कुदळे, भाऊसाहेब मसे, आरपीयआयचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, सुरेश कठारे, संजय पवार, भागवत जटाळे, बालाजी मसे, रत्नदिप बिडवे, प्रदीप चंदने, विकास साठे, एस.आर. भुतेकर, ए.एस. पाटील, ए.एस. कानडे, आर.पी. सुर्यवंशी, एस.एस. बिसले, पी.एल. शेषाणी, एस.बी. मस्के, आदींसह शिक्षकप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा