Breaking

गुरुवार, १६ मार्च, २०२३

सामाजिक क्रांती मंच च्या प्रदेशाध्यक्ष सुशीलाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिन मोठ्या थाटात संपन्न*


*सामाजिक क्रांती  मंच च्या प्रदेशाध्यक्ष सुशीलाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिन मोठ्या थाटात संपन्न*    


लातूर प्रतिनिधी  दि १४ मंगळवारी जिल्हा लातूर    तालुका औसा. येथील खुंटेगाव येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला ! हा कार्यक्रम क्रांती मंच महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष सौ.शांता शेळके , सुवर्णा कोल्हे , मीराताई पांढरे, गीतांजली पांढरे, भाग्यश्री पवार,सरीता स्वामी , मोहिनी कोल्हे व सरपंचबाई सुकुमार साबदे व प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती मंचच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा सौ.सुशीलाताई गायकवाड सोलापूर यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला ! तसेच गावातील कर्तृत्ववान महिलांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.गावातील माता भगिनींनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन  कार्यक्रमाची शोभा वाढवली ! 
कार्यक्रमात महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा खेळ घेण्यात आला त्यामध्ये संगीत खुर्ची,पायाला फुगा बांधून फोडणे व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या सुशीला ताई गायकवाड यांनी सुमधुर आवाजात आपले गीत गायन केले असे विविध खेळ घेण्यात आले सर्व महिलांनी गेममध्ये भाग घेवून  महिलांनी आनंद घेतला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा