Breaking

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी- काळाणे, उपाध्यक्षपदी-जमदाडे बिनविरोध




छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी- काळाणे, उपाध्यक्षपदी-जमदाडे बिनविरोध


श्रीगोंदा-नितीन रोही


छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आ. राहुल जगताप व महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा,घनश्याम शेलार यांनी बाजीगर ची भूमिका बजावल्याने अध्यक्ष पदी सुभाष काळाणे तर उपाध्यक्षपदी शरद जमदाडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

या निवडणूकीत राष्ट्रवादीचे६ , भाजपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी-२,शिवसेना(शिंदें गट)१अश्या प्रकारे सदस्य निवडून आलेले होते.

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आयोजीत केलेली कोरम अभावी पहिली सभा तहकूब झाली होती.
ती शुक्रवार दि. १७ मार्च रोजी झाली. या मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक पार पडली या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडीत काहीजनांनी सदस्यांचा घोडेबाजार करणार असल्याचे लक्षात येताच आ. जगताप,शेलार, नाहाटा यांनी दोन अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादीकडे आणले. त्यामुळेच राष्ट्रवादी च्या ताब्यात ऐक हाती सत्ता आली.




निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात यांनी काम पाहिले.

यावेळी राष्ट्रवादी नेते मा. आ. राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार, आण्णासाहेब शेलार, हरिदास शिर्के,दादासाहेब औटी,भाजपाचे प्रतापसिंह पाचपुते, काँग्रेसचे दिपक भोसले, दत्तात्रय पानसरे यांच्या सह खरेदी विक्रीसंघाचे काही संचालक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा