Breaking

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

परिस्थिती गरीब असली तरी मनाची श्रीमंती मोठी असावी ~ ह.भ.प पठाडे



परिस्थिती गरीब असली तरी मनाची श्रीमंती मोठी असावी ~ ह.भ.प पठाडे


कन्हेरगाव(प्रतिनिधी)
             आपली परिस्थिती गरीब असली तरी मनाची परिस्थिती मोठी असल्यास जीवनामध्ये कधीच अडचण येणार नाही माणसाने जीवन जगत असताना परिस्थिती गरीब आहे म्हणून खचून न जाता आयुष्य खचून जगले पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प ज्ञानेश्वर (माऊली) महाराज पठाडे यांनी केले. ते रांझणी तालुका माढा येथे प.प.ओंकारनाथ महाराज यांच्या 33 व्या जन्म समाधीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यामध्ये बोलत होते.
             यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की माणसाला आयुष्यामध्ये काही अडचण आली तर माणूस आत्महत्येचा विचार करतो असा विचार न करता युवक शेतकरी यांनी आयुष्य हे मनाची परिस्थिती मोठी ठेवून जगले पाहिजे मनाची परिस्थिती मोठी ठेवली तर आयुष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. रांझणी तालुका माढा येथील ओंकारनाथ देवांच्या 33 व्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री.ओंकारनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कीर्तनाच्या निमित्ताने ह.भ.प माऊली महाराज पठाडे बोलत होते.
           गुरुवार दिनांक 9 मार्च पासून 16 मार्च पर्यंत या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 9 मार्च रोजी ह.भ.प संतोष महाराज मगर (भाटनिमगाव ता.इंदापुर),10 मार्च रोजी ह.भ.प प्रा. रामदास महाराज कदम (गोखळी ता.फलटण)  11 मार्च रोजी ह.भ.प हनुमंत महाराज मारकड(कात्रज ता.करमाळा), 12 मार्च रोजी ह.भ.प मधुकर महाराज गिरी (नान्नज सोलापूर), 13 मार्च रोजी ह.भ.प विठ्ठल महाराज धोंडे (आळंदी देवाची),14 मार्च रोजी ह.भ.प सागर महाराज बोराटे(नातेपुते),15 मार्च रोजी अनिरुद्ध महाराज निंबाळकर (बिटरगाव ता.करमाळा), 16 मार्च रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर (माऊली) महाराज पठाडे (कर्जत-जामखेड) यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन ओंकारनाथ उत्सव मंडळ, रांझणी ग्रामस्थ व देवकृपा सेवा ग्रुप यांनी आयोजन केले होते. या दिमाखदार सोहळ्याचे कौतुक सर्व महाराजांनी केले.या सोहळ्यासाठी दररोज हजारो भाविकांनी उपस्थिती लावत या सोहळ्याचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा