विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह
पिंपळनेर प्रतिनिधी /महेश देशमुख
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर या वर्षीही राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी ४ ते ११ मार्च हा कालावधी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीस कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे यांच्या व सर्व खातेप्रमुख यांच्या शुभहस्ते कै.मा.आ. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर कारखान्याचे वर्क्स मॅनेजर यांनी सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व, सर्व कर्मचा-यांना सुरक्षितेतच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी तसेच राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह ४ ते ११ मार्च या कालावधी पुरता मर्यादीत न राहता त्याचे महत्व सर्व कामगारांनी कायमस्वरूपी अंगीकृत करणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
तसेच कारखान्याचे चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे यांनी आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार करण्याच्या पध्दती, सुरक्षिततेचे घोषवाक्य, फायर सिस्टम, रूग्णवाहिका, आगीचे प्रकार, कारखान्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध असलेली फिक्स फायर इन्स्टॉलेशन सिस्टीम इत्यादी संदर्भात सविस्तर माहीती कर्मचा-यांना दिली.
तसेच कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे यांनी देखील कर्मचा-यांना सुरक्षा सप्ताहाचे महत्व व संकल्पना स्पष्ट करून कामगार हा संस्थेचा केंद्रबिंदू असून कर्मचा-यांनी काम करीत असताना कामामध्ये एकाग्रता ठेवून अपघात होणार नाही या दृष्टीने योग्य ती दक्षता घेणेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सेफ्टी ऑफिसर एम.एस.देशमुख यांनी उपस्थित कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने, जनरल मॅनेजर(प्रोसेस) पी.एस.येलपले, फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, डिस्टीलरी मॅनेंजर पी.व्ही.बागल,चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे, चिफ केमिस्ट ए.के.जगताप, सिव्हील इंजिनिअर एस. आर.शिंदे, हेड टाईम किपर आर.एन.आत्तार,सेफ्टी ऑफिसर एम.एस.देशमुख, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एम.जाधव यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा