पिलीव येथील प्रा डॉ विक्रम नारायण पाटील यांची शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
पिलीव प्रतिनिधी- माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रा डॉ विक्रम नारायणराव पाटील यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे सदस्य तसेच पी एच डी चे मार्गदर्शक म्हणूनही काम करीत आहेत. प्रा डॉ विक्रम पाटील यांना या कामी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ डी टी शिर्के, शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश पवार, माजी विभाग प्रमुख प्रा डॉ रविद्र भणगे,प्राचार्य डॉ वाय बी गोंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉ विक्रम पाटील हे सध्या कोरेगाव येथील शंकरराव जगताप आर्टस अँन्ड कामर्स कॉलेज येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. प्रा डॉ विक्रम पाटील यांच्या हया यशाबद्दल शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांडुन अभिनंदन व कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा