Breaking

बुधवार, ८ मार्च, २०२३

यात्रेनिमित्त भाविकांसाठी पोलीस व आरोग्य मदत केंद्र



यात्रेनिमित्त भाविकांसाठी पोलीस व आरोग्य मदत केंद्र


श्रीगोंदा-नितीन रोही
 
शहरातील श्री संत शेख महंमद महाराज यांचा दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी यात्रा महोत्सव झाला, यात्रेत विविध प्रकाराचे शॉपींग स्टॉल मिठाईचे  दुकाने खेळणीवाले आकर्षण प्रकारचे पाळणे, रात्री पालखी मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी व लोकनाट्यांचा कार्यक्रम झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले संत शेख महमंद महाराज हे प्रसिद्ध आहेत.सर्व भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले. या मध्ये जंगी कुस्त्या झाल्या. यात्रे मध्ये यात्रा कमिटीचे सर्व मेंबर,आजी-माजी आमदार, खासदार, सर्वच नेते मंडळी, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक भोसले यांच्या सह आरोग्य सेवा देणारे  श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ सौ सविता ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ नवीन यादव,डॉ तिवाटने यांचा सर्व स्टाप व दत्ताजी जगताप यांनी भरपूर सेवा दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा