Breaking

रविवार, १९ मार्च, २०२३

टेंभुर्णी येथिल टिळक रोड मित्र मंडळाची ,अपघातग्रस्त मित्राला केली तातडीने दीड लाखाची मदत.



टेंभुर्णी येथिल टिळक रोड मित्र मंडळाची ,अपघातग्रस्त मित्राला केली तातडीने दीड लाखाची मदत. 



टेंभुर्णी (प्रतिनिधी) टेंभुर्णी येथील टिळक रोड मित्र मंडळांने टिळक रोड येथील रहिवासी अनिल स्वामी यांना तातडीची मदत म्हणून हातोहात पैसे जमा करून तब्बल दीड लाख रुपयांची मदत लगेच एक दिवसात केली.या बाबत ची सविस्तर हकिगत अशी की अनिल स्वामी हे आपल्या कुटुंबासह बाजार असणार्‍या ठिकाणी जाऊन बिस्किटे व टोस्ट विकण्याचा व्यवसाय करतात. बुधवार दिनांक 15 मार्च रोजी ते आपल्या पत्नी व दोन मुलासह कंदर या ठिकाणाहून बाजार साठी जात असताना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या तीन चाकी टमटम चा अपघात झाला टमटम पलटी होऊन वरील स्वामी कुटुंब हे अपघातग्रस्त होऊन जखमी झाले त्यामध्ये स्वत अनिल स्वामी व त्यांची दोन मुले ही किरकोळ जखमी झाले परंतु त्यांच्या पत्नी अश्विनी स्वामी यांना डोक्याला व मणक्याला आघात होऊन त्या बेशुद्ध झाल्या त्यांना तातडीने अकलूज येथील इनामदार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले श्री अनिल स्वामी यांची परिस्थिती अत्यंत हलकीचे असून अश्विनी स्वामी यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यांना इनामदार हॉस्पिटलचे बिल भरणे व पत्नीला पुढील उपचारांसाठी व ऑपरेशन साठी पुणे येथे घेऊन जाणे गरजेचे होते त्या समई टिळक रोड मित्र मंडळातील सुज्ञ मंडळींनी श्री.स्वामी यांना मदत करण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी आवाहन केले असता एक तासांमध्ये एक लाख रुपये गोळा झाले व गावातील काही प्रतिष्ठित व मित्रमंडळी यांनी स्वतःहून मदत देऊ केली त्यातून अवघ्या एक दिवसात दीड लाख रुपये मदत गोळा झाली असून उपचारासाठीचा खर्च सात ते आठ लाख रुपये आहे त्यांना अजून मदतीची गरज असून ज्यांना स्वामी कुटुंबीयांना मदत करायची आहे त्यांनी खालील  फोन पे / गुगल पे नंबर
९४०४६९०३८९युवराज शिंदे (गुरुजी) क्रमांक वर मदत करावी अथवा मदतीसाठी संपर्क करावा असे आवाहन टिळक रोड मित्र मंडळातर्फे करण्यात येत आहे.  चौकट करा -वरील मदतीचे आवाहन सोशल मीडिया च्या माध्यमातून केले असता त्याला लगेच प्रतिसाद देत टेंभुर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठान, नरसिंहनगर यांनी तातडीने अकरा हजार रुपये रोख मदत केली. प्रतिष्ठानच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा