नवीन झाडे लाउन त्यांच्या बुडाशी वडिलांच्या
रक्षेचे केले विसर्जन.....
.... पाच दिवसाचेच सुतक पाळणार..
........ तुकाराम ढवळे
बेंबळे ।प्रतिनिधी।
वृत्तांत असा की माढा तालुका खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन व माढा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे यांचे वडील तथा बेंबळे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रोहिणी तुकाराम ढवळे यांचे सासरे, बाळासाहेब विठोबा ढवळे उर्फ आप्पा(वय-७५) यांचे सापटणे( टे.) येथे शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी निधन झाले. रविवारी, दि. 19 रोजी सकाळी तिसऱ्या दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ढवळे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता, यावेळी सापटणे(टे.) गावच्या स्मशानभूमी आवारात वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करून या झाडांच्या बुडाशी बंडूनाना ढवळे यांनी वडिलांच्या रक्षेचे विसर्जन केले. याचप्रमाणे आम्ही दहा दिवसाच्या ऐवजी पाच दिवसच सुतक पाळणार असून पाचव्या दिवशीच दहाव्याचे सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असल्याचेही बंडूनाना ढवळे यांनी आवर्जून सांगितले.
संकल्प........
पुढील वर्षी वडील स्वर्गीय बाळासाहेब उर्फ आप्पा ढवळे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सापटणे( टे)च्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य मोफत वाटप करण्याचा आमचा संकल्प असल्याचे बंडूनाना ढवळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा