नेर्ले सोसायटीवर माजी आमदार जयंतराव जगताप जगताप गटाचे वर्चस्व :
करमाळा प्रतिनिधी
नेर्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे . जगताप गटाचे सोसायटीचे विद्यमान चेअरमन तानाजी जगताप यांच्या नेतृत्वा खालील ग्रामविकास शेतकरी पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले . इतर मागास प्रवर्गातून फिरोज मोमीन यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते .
अन्य विजयी उमेदवारांमधे तानाजी जगताप, राहुल भोसले, शहाजी गवळी, नाना नाईक, रुपेश पोळ , सौ .कान्होपात्रा पन्हाळकर, सतीश शेळके, सखाराम ठोंबरे, सौ .सुरेखा गलांडे, सौ पद्मिणी दोंड, लक्ष्मण कोपनर, अभिमान लोंढे यांचा समावेश आहे . सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार जयवंतराव जगताप , नगराध्यक्ष वैभव जगताप,तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस . के . मुंढे यांनी काम पाहीले . मतदान व मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा