Breaking

रविवार, २६ मार्च, २०२३

पोक्सो आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीस जामिन मंजुर .


पोक्सो आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीस जामिन मंजुर .

टेंभुर्णी/ प्रतिनिधी

पोक्सो आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी अजित कांबळे, रा. मोरवड येथील आरोपीस बार्शी अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश मे. जे. सी. जगदाळे यांनी जामीन मंजुर केला आहे.


   यात हकीकत अशी की, ऑक्टोबर २०२१ व दि. ३१/ १२ / २०२१ रोजी मध्यरात्री मौजे हिसरे, ता. करमाळा येथील जि. प. शाळेच्या समोर आरोपी नागेश नवले याने पिडीत बालिका (बदललेले नाव) निर्भया हिस बोलावुन लग्नाचे आमिष दाखवुन तसेच घरातील लोकांना जीवे ठार मारणेची धमकी देवुन जबरदस्तीने शरीरसंबंध केले तसेच निर्भयाचा पाठलाग करून बदनामी करेन, शाळेत जाऊ देणार नाही अशा धमक्या देत. हि बाब पिडीताने आईस सांगितली असता आरोपीस जाब विचारणेसाठी पिडीता व तिची आई आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने व त्याच्या भावाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याने दोघा भावा विरूध्द प्रथमतः करमाळा पोलिस ठाणे अंतर्गत दि. ०४/०१/२०२२ रोजी पोक्सो व अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
पुढे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील पोलिस तपासात पिडीत बालिकाचे गर्भाचे नमुने, आरोपी अजित कांबळेचे नमुने व डि. एन. ए. सॅम्पल त्यांचे एकमेकां सोबत जुळल्याने पोलिसांनी अजित कांबळे, रा. मोरवड, ता. करमाळा यास दिनांक ०८/०२/२०२३ रोजी अटक करून मे. न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सदर आरोपी अजित कांबळे याने श्री. एस. के. लोणकर अॅडव्होकेट यांचे मार्फत मे. जिल्हा व सत्र न्यायालय, बार्शी येथे जमिन अर्ज दाखल केला असता मे. न्यायालयाने पिडीता व तिची आई यांस मे. न्यायालयात बोलावुन अंतिम सुनावणी घेवुन आरोपीचे वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस सशर्त जामिन मंजुर केला. याकामी आरोपी अजित कांबळे तर्फे ॲड. एस. के. लोणकर, रा. टेंभुर्णी तर पिडीत निर्भया तर्फे ॲड. एम. ए. कदम, रा. कंदर तर सरकार पक्षातर्फे ॲड. बोचरे साो. यांनी काम पाहिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा