Breaking

मंगळवार, १४ मार्च, २०२३

करमाळा मेडिकोज गिल्ड च्या वतीने महिला मॅरेथॉन स्पर्धा संपन्न



करमाळा मेडिकोज गिल्ड च्या वतीने महिला मॅरेथॉन स्पर्धा संपन्न .


कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

अबला नव्हे पर सबला नारी …सशक्त नारी… आरोग्यदक्ष नारी हे ब्रीद ठेऊन करमाळा येथे १२ मार्च रोजी करमाळा मेडिकोज गिल्ड या वैद्यकीय संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत “ वुमेन्स मॅरॅथॉन “ या स्पर्धेचे आयोजन करणयात आले होते .
   या स्पर्धेत प्रथम क्रमांक  मोनिका हजारे , द्वितीय भावना गरड, तृतीय आशा पाडुळे तर उत्तेजनार्थ रुपाली जगताप व प्रिती ढावरे यांना दिले . वैद्यकीय महिलांमधे प्रथम रेखा कटके, द्वितीय  रेणुका बंडगर व तृतीय डॉ विद्या दुरंदे तर डॉ चेतना शिंदे व डॉ अनुराधा शेलार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना कोमल घुमरे व ज्योतीचंद भाईचंद सराफ & सन्स प्रा लि यांच्या वतीने महिला विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. 
       या स्पर्धेस ज्याेतीचंद भाईचंद सराफ & सन्स प्रा लि बारामती यांचे दिगंबररावजी बागल पेट्रोलियम यांचे प्रायोजकत्व लाभले. या स्पर्धेस सन्माननीय उप जिल्हा रुग्णालय अधीक्षक डाॅ गुंजकर उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी डाॅ श्रध्दा जवंजाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.पाहुण्यांचे आभार केएमजी अध्यक्षा डाॅ .चेतना शिंदे व उपाध्यक्षा डाॅ. प्राजक्ता पाठक यांनी मानले. 
   यावेळी अध्यक्ष डाॅ . यशवंत व्हरे, उपाध्यक्ष डाॅ. सुहास कुलकर्णी, संस्थापक अध्यक्षा डाॅ .वर्षा करंजकर, डाॅ .बालाजी कटके, डाॅ. संतोष आटोळे, डाॅ. मनोज काळे, डाॅ .राहूल राऊत , डॉ .अमोल घाडगे, डॉ.हर्षवर्धन माळवदकर  यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले .
 .करमाळ्याच्या इतिहासातील पहिलीच वुमेन्स मॅरेथॉन म्हणुन याच विशेष कौतुक केल जात आहे .

चौकट -
 केएमजी तर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट मेडल पाणी बॉटल नाष्टा व चहा याची मोफत सुविधा निर्माण करून दिली होती.

चौकट - स्पर्धेनंतर सर्व डॉक्टरांनी तेथील पाणी बॉटल कागदाच्या पिशव्या कागदाच्या डिश सर्व कचरा स्वतःहून गोळा करून परिसर स्वच्छ करण्याचे काम केले.

चौकट - या स्पर्धेत ६० वर्ष वयाच्या ४ महिला उस्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या व त्या सर्वांनी ३ किमी धावल्या हे विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा