मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करमाळा येथील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू!!!
जिल्हाप्रमुख महेश चिवटे !!!
सतराशे एकर क्षेत्रावरील केळी पिकाची नुकसान!!
आंब्याचे सर्व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश.!!!
16 घरांचे नुकसान!!!
चार जनवरी दगावली!!!
**********************************
करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळात व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामेचे काम वेगाने सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महसूल विभाग कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मिळून एकत्रित या सर्व नुकसानीचे पंचनामे करत आहेत
शेतकऱ्यांनी जागृत राहून आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यकमार्फत करून घ्यावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
पंचनामे होत नसल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान शिवसेनेच्या वतीने केले आहे
करमाळ्याचे तहसीलदार विजयकुमार जाधव व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत
सतराशे एकर क्षेत्रावरील केळीचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
डाळिंब आंबा आधीच सर्व प्रकारच्या फळबागांचे पंचनामे सुरू आहेत
घराचे नुकसान झाले संदर्भात बांधकाम विभाग करमाळा मार्फत पंचनामे सुरू आहे
#####
विजयकुमार जाधव
तहसीलदार करमाळा---
अवकाळी पावसाने झालेले नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत ज्या ठिकाणी पंचनामेला अधिकारी पोहोचत नसतील अशा भागातील शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आव्हान तहसीलदार यांनी केले आहे
##₹#
संजय वाकडे ---
तालुका कृषी अधिकारी करमाळा
तालुक्यात केळी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाच्या आदेशानुसार पंचनामे सुरू आहेत
दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होतील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाचा अहवाल पाठवला जाईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा