कुर्डूवाडी बाजार समितीवर शिंदे बंधूंचे वर्चस्व कायम.... विरोधी पॅनलचा सुपडा साफ....
. शिवसेनेचे संजय कोकाटे यांना लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की.....
बेंबळे। प्रतिनिधी।
माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डुवाडी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महाविकास आघाडीने एक जागा बिनविरोध तर इतर सर्वच्या सर्व 17 जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत एकूण 18 जागावर आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. तर विरोधी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व माढा विधानसभा मतदारसंघ शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे.
शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान झाले होते, आज दिनांक 29 रोजी सकाळी आठ वाजता माढा येथे मतमोजणीस सुरुवात झाली, व प्रथमपासूनच आमदार शिंदे यांच्या शेतकरी महाविकास आघाडीने प्रचंड बहुमताने विजया कडे वाटचाल सुरू केली. कुर्डूवाडी बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार शिंदे बंधूंच्या पॅनल विरोधात प्राध्यापक शिवाजी सावंत संजय कोकाटे प्राध्यापक सुहास पाटील व इतर सर्व विरोधक एकत्र एकवटलेले होते .प्रचाराचा आठवडाभर मोठा धुरळा उडाला होता. एकूण 3983 मतदारांपैकी 3811 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व 95 टक्के मतदान झाले होते. सहकारी संस्था मतदारसंघात 11 जागावर आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलने ८० टक्के मते मिळवून भरघोस विजय संपादन केला व याचप्रमाणे ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल तोलार या मतदारसंघात ही आमदार शिंदे बंधूंच्या पॅनलने मोठे मताधिक्य मिळवून विरोधी पॅनल ची धूळधाण उडवून टाकली. सोसायटी मतदारसंघात विद्यमान चेअरमन आमदार संजय मामा शिंदे, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुहास पाटील जामगावकर हे प्रचंड मतांनी विजयी झाले. प्राध्यापक शिवाजी सावंत व संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेले शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांना या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये मानहानीकारक लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेना,भाजप ,मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती ,रयत क्रांती, संभाजी ब्रिगेड इतक्या संघटना एकत्रित येऊनही आ. बबन दादा आणिआ. संजय मामा यांच्या विकासाचा अश्व कोणताही विरोधक रोखू शकला नाही ही सत्य वस्तुस्थिती संपूर्ण माढा मतदार संघ व सोलापूर जिल्ह्याने आज पाहिली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दादा मामा समर्थकांनी मोठा जल्लोष केला ,गुलालाची उधळण केली मिठाई वाटली तर गावोगावी फटाक्यांची आतषबाजी व मिरवणुकीचा जल्लोष केला .
चौकट ..आ.बबनदादा शिंदे
मागील तीस वर्षांपासून माढा मतदारसंघात आम्ही शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून विकासकामे करत आहोत. दूध व्यवसाय, साखर कारखाने, वीज, पाणी, रस्ते आरोग्य, शिक्षण इत्यादी मूलभूत विकासाची कामे करत असताना मी नेहमीच जनतेच्या सर्वांगीण प्रगतीचा व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे व यापुढेही आम्ही करत राहणार आहोत. या सर्व विकास कामाची पावती मतदारांनी नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत 80 ते 85 टक्के मतदान आमच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलला करून दिलेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला गावोगावी जनतेपर्यंत पोहोचण्याची एक नामी संधी मिळाली, या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाचा विचार करता 80 ते 85 टक्के मतदारांनी आम्हाला मतदान केले हे सिद्ध झाले आहे. संपूर्ण मतदानापैकी सात ते आठ टक्के मते बाद झालेले आहेत व ही चुकून किंवा कांही अज्ञानीपणामुळे बाद झालेली सर्व मते आमच्याच पॅनलला पडलेली आहेत हेही दिसून येत आहे.
मागील वीस वर्षात मार्केट कमिटीची निवडणूक कधीच लागली नाही, सध्याच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले, परंतु यामध्ये काही दुय्यम स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना आपण तालुक्याचे नेते होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत व त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीकेची झोड उठूउन निरर्थक व अविश्वासनीय असेच काम करून दाखवून त्यांच्या बुद्धीची कुवत दाखवून दिली आहे, तरीही सर्व मतदारांनी आमचे सतरा उमेदवार भरघोस मतांनी निवडून दिले व एक उमेदवार बिनविरोध असे सर्वच्या सर्व एकूण 18 उमेदवार निवडून आलेला आहेत. या निवडणुकीमध्ये मागील सहा सात दिवसात ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले , व मतदारांनी जागरूकतेने आम्हाला भरघोस मतदान करुन आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्या बद्दल सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.... आमदार बबनदादा शिंदे
आ.संजयमामा शिंदे......
माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीमध्ये माढा तालुक्यातील मतदारांनी 80 ते 85 टक्के मतदान आमच्या पॅनलला करून आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला याचे कारण म्हणजे सातत्याने आम्ही आजपर्यंत करत आलेली विकास कामे व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रगतीचे व आर्थिक जीवनमान उंचावण्याचे कार्य हेच होय .25 लाख रुपये उलाढाली ची मार्केट कमिटी माझे अध्यक्षतेखाली जेव्हापासून कार्यरत झाली तेव्हापासून ते आज पर्यंत पाच कोटी रुपये पर्यंत उलाढाली होत आहेत व मार्केट कमिटीच्या दोन कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. टेंभुर्णी मोडनिंब कुर्डूवाडी माढा या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यासाठी सोयी सुविधा पुरवण्यासाठी व शेतमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत व भविष्यात देखील करत राहणार आहोत. विरोधकांनी खोटे बिन बुडाचे व निरर्थक आरोप करून रान उठवले, पण ते सर्व काही पाण्यातले बुडबुडे ठरले आहेत,जनतेने विरोधकांना पूर्णपणे नाकारले हे आता सिद्ध झाले आहे .'एकच ध्यास, शेतकऱ्याचा व जनतेचा विकास' हेच ब्रीदवाक्य आम्ही सत्यात उतरवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो व यापुढेही आमच्या कार्यातून दाखवून देणार आहोत हे निश्चित.
शेतकरी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचा आणि तमाम मतदार बंधू भगिनींचा मी अत्यंत आभारी आहे .
आमदार संजय मामा शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा