गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात उपाय योजना करणे काळाची गरज डॉक्टर श्रद्धा जवंजाळ
करमाळा प्रतिनिधी
गर्भाशयाचा कॅन्सर हा मोठा आजार सध्या महिलांमध्ये दिसून येत असून याला प्रति प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असून ही लस घेतली तर 99 टक्के महिला या आजारापासून दूर राहू शकते त्यासाठी या लसीकरणाची गरज आहे असे मत गर्भाशयाच्या कॅन्सरवर संपूर्ण देशात जनजागृती करणारे डॉक्टर श्रद्धा जवजाळ यांनी व्यक्त केले
ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रतिबंध करणाऱ्या लस इच्छुक असणाऱ्या महिलांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला
270 महिलांनी यात नोंदणी करून या महिलांना पुढील महिन्यात लस देण्यात येणार आहे
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी प्रमुख मंगेश चिवटे डॉक्टर कविता कांबळे शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड
आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉक्टर श्रद्धा म्हणाले की राज्यात दरवर्षी 70 हजार महिला गर्भाशयाचे कॅन्सर मुळे मृत्यूमुखी पडतात
प्रतिबंध करणारी लस आहे
विशेषतः सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्त्रियांनी तरुणींनी ही लस घेणे गरजेचे आहे
प्रतिबंधक लसची किंमत चार हजार रुपये आहे लस या शिबिरात मोफत देण्यात येत आहे
करमाळा शहरातील तालुक्यातील महिलांनी या संदर्भात सजग राहून महिलांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त महिलांची लस घेण्यासाठी नोंदणी करावी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनेक उपक्रम घेऊन आरोग्याच्या संदर्भात दक्ष आहेत
बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे मोफत कॅन्सर वरचे उपचार केले जातात
फक्त लोकांना माहिती नसल्यामुळे सेवा मिळत नाही यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत
विशेषता कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे
करमाळ्यातील अकरावीतील मुलगी अमृता लावंड तिने जवळपास 62 महिलांना प्रबोधन करून ही लस घेण्यास प्रवृत्त केले व त्यांची नाव नोंदणी केली या तिच्या उपक्रमाबद्दल बद्दल डॉक्टर
श्रद्धा जवंजाळळ यांनी त्यांचा सत्कार केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा